ऑनलाईन सट्टेबाजीवर कारवाई - तीन संशयितांना अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: October 12, 2023 10:10 IST2023-10-12T10:09:40+5:302023-10-12T10:10:05+5:30

ऑनलाईन सट्टेबाजीवर पर्वरी पोलिसांनी छापा मारून ३ संशयितांना अटक केली आहे.

Action on online betting - three suspects arrested | ऑनलाईन सट्टेबाजीवर कारवाई - तीन संशयितांना अटक

ऑनलाईन सट्टेबाजीवर कारवाई - तीन संशयितांना अटक

काशीराम म्हांबरे

म्हापसा : भारत आणि अफगाणिस्तान या संघा दरम्यान संपन्न झालेल्या विश्वचषक क्रिकेट सामन्यावर सुरु असलेल्या ऑनलाईन सट्टेबाजीवर पर्वरी पोलिसांनी छापा मारून ३ संशयितांना अटक केली आहे.

निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. आल्त-पिळर्ण परिसरातील एका बंगल्यावर विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी सुरु असल्याची माहिती उपलब्ध होताच पोलिसांनी छापा मारला.  मारलेल्या छाप्यात मोबाईल फोन, लॅपटॉप, तसेच इतर वस्तू मिळून सट्ट्यासाठी वापरले जाणारे सुमारे१ लाख रुपयाचे साहित्य जप्त केले.

अटक करण्यात आलेल्या संशयितात शंकर एन ( वय ४६), रुपेश पी ( वय ३४) तसेच आर कुमार ( वय ३२) सर्व कर्नाटक यांचा समावेश होतो. त्यांच्या विरोधात जुगार कायद्याचे कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास कार्य अधिक्षक निधीन वाल्स तसेच निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 

Web Title: Action on online betting - three suspects arrested