विवाहित महिलेवर बलात्कार प्रकरणातील फरार संशयित पश्चिम बंगालातील हावडा येथे जेरंबद

By सूरज.नाईकपवार | Updated: July 10, 2023 18:04 IST2023-07-10T18:03:51+5:302023-07-10T18:04:08+5:30

चालू वर्षाच्या ९ जून ते २० जून पर्यंत संशयिताने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला होता.

Absconding suspect in married woman rape case arrested in Howrah, West Bengal | विवाहित महिलेवर बलात्कार प्रकरणातील फरार संशयित पश्चिम बंगालातील हावडा येथे जेरंबद

विवाहित महिलेवर बलात्कार प्रकरणातील फरार संशयित पश्चिम बंगालातील हावडा येथे जेरंबद

मडगाव : गोव्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका सत्तावीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार करुन फरार झालेल्या नाबाकुमार सरदार (२६) याला गोवा पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यातील हावडा येथे जेरंबद केले. सोमवारी त्याला घेउन पोलिस गोव्यात पोहचले संशयित पिडित महिलेच्या पतीचा नातेवाई आहे. त्याविरुध्द भादंसंच्या ३६६, ३७६ व ५०६ कलमाखाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपासासाठी या संशयिताला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण देसाई यांच्या उपनिरीक्षक वर्षदा नाईक देसाई पुढील तपास करीत आहेत.

चालू वर्षाच्या ९ जून ते २० जून पर्यंत संशयिताने पिडितेवर लैंगिक अत्याचार केला होता. झाल्या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागेल अशी धमकीही त्याने दिली होती. पिडित महिला मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी भाडयाच्या घरात रहात होती. तिथे संशयिताने तिच्यावर बलात्कार केला होता.

Web Title: Absconding suspect in married woman rape case arrested in Howrah, West Bengal