शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

Abhilash Tomy : नौदल कमांडर अभिलाष टॉमी यांची ही यशस्वी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 11:51 AM

Abhilash Tomy : आॅस्ट्रेलियाच्या खोल समुद्रात नौका (यॉट) स्पर्धेच्यावेळी 14 मीटर उंचीच्या लाटेच्या तडाख्यात गंभीर जखमी झालेला भारतीय नौदलाचे गोवास्थित अधिकारी लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी (वय 39 वर्ष) यांनी याआधी अनेक सागरी परिक्रमांमध्ये भाग घेऊन त्या यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत.

पणजी : आॅस्ट्रेलियाच्या खोल समुद्रात नौका (यॉट) स्पर्धेच्यावेळी 14 मीटर उंचीच्या लाटेच्या तडाख्यात गंभीर जखमी झालेला भारतीय नौदलाचे गोवास्थित अधिकारी लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी (वय 39 वर्ष) यांनी याआधी अनेक सागरी परिक्रमांमध्ये भाग घेऊन त्या यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. अभिलाष यांना त्यांच्यावर उद्भवलेल्या या संकटानंतर फ्रेंच मच्छिमारी नौकेवरील कर्मचा-यांनी वाचविले. गोव्याच्या या नौदल अधिका-याने  ‘आयएनएसव्ही म्हादई ’या शिडाच्या बोटीतून दक्षिण पूर्व आशिया सफर केली. या सागरी परिक्रमेत अभिलाष यांनी चार जणांच्या पथकाचे नेतृत्त्व केले. १७ मार्च २0१२ रोजी वेरें येथील आयएनएस मांडवी तळावरुन ही बोट निघाली आणि मलेशिया व थायलँडला भेट देऊन ५000 सागरी मैल अंतर पार करुन परतली. भर समुद्रात इंजिनाशिवाय शिडाच्या सहाय्याने बोट हाकण्याचे साहस नौदलाचे हे पथकाने केले.  

अभिलाष त्यावेळी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले होते की, ‘अनेकदा जोरदार वारा असतो त्यामुळे बोट भरकटण्याचा संभव असतो ती नियंत्रणाखाली ठेवून आखून दिलेल्याप्रमाणेच मार्गक्रमण करणे मोठे जिकिरीचे काम असते. दिवसभर कडक उन्हातून प्रवास करावा लागतो. इंजिनचा वापर केवळ आणीबाणीच्यावेळीच केला जातो नपेक्षा या सफरीचे भवितव्य निसर्गावरच अवलंबून असते. त्यामुळे मोठी कसरत करीत मार्गक्रमण करावे लागते.’

अभिलाष यांनी त्याआधीही गोवा ते दक्षिण आफ्रिकेतील केप आॅफ टाउन असा साडेपाच हजार सागरी मैलांचा प्रवास शिडाच्या बोटीतून एकट्याने केलेला आहे.  सहा महिला नौदल अधिका-यांनी अलीकडेच ‘आयएनएसव्ही तारीणी’ या शिडाच्या बोटीतून तब्बल २५४ दिवसांची सागर परिक्रमा पूर्ण केली. या सहा महिला नौदल अधिका-यांनाही कमांडर अभिलाष टॉमी यांचे मार्गदर्शन लाभले होते. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदल