अपहरण झालेल्या मुलीची मुंबईतून सुटका; अवघ्या २४ तासात तरुणास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By काशिराम म्हांबरे | Updated: January 9, 2024 16:27 IST2024-01-09T16:27:23+5:302024-01-09T16:27:54+5:30
म्हापसा येथील सरकारी वसहतिगृहातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची फूस लावून अपहरण करण्यात आले होते.

अपहरण झालेल्या मुलीची मुंबईतून सुटका; अवघ्या २४ तासात तरुणास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
काशिराम म्हांबरे, म्हापसा: म्हापसा येथील सरकारी वसहतिगृहातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची फूस लावून अपहरण केल्या प्रकरणी पोलिसांनी अजय तायडे ( वय २२ , मूळ मध्य प्रदेश) या तरुणास येथील पोलिसांनी अवघ्या २४ तासात मुंबईतून अटक केली आहे.
वसहतिगृहातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार वसहतीगृहाच्या वॉर्डनकडून रविवार ७ रोजी पोलिसात देण्यात आली होती. सदर मुलगी बाजारात खरेदीसाठी गेली होती, मात्र ती वसहतिगृहात पुन्हा दाखल न झाल्याने वॉर्डनने अपहरण झाल्याची शंखा तक्रारीतून व्यक्त केली होती.
पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन घेत तपास कार्य आरंभले होते. तपासा दरम्यान ही मुलगी एका तरुणासोबत मुंबईला गेल्याची माहिती पोलिसांनी उपलब्ध झाली. त्यानुसार मुंबई पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. ती दोघेनाबाडा पोलीस स्तानकाच्या हद्दीत असल्याचे समजतात तेथील पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. नंतर मुंबईत गेलेल्या म्हापसा पोलिसांनी नाबाड पोलिसांच्या सहकार्याने तरुणाला अटक करून मुलीची सुटका केली. पुढील तपास कार्य निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या वतिने सुरु करण्यात आले आहे.