गॅस सिलेंडर वाहू ट्रक मध्यरात्री मडकई येथे कलंडला; सुदैवाने जीवित हानी नाही
By आप्पा बुवा | Updated: July 11, 2024 18:20 IST2024-07-11T18:19:58+5:302024-07-11T18:20:38+5:30
मडकई औद्योगिक वसाहती मधून काही अंतर पार केल्यानंतर समोरून अचानकपणे एक वाहन भरधाव वेगाने आले. त्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा ताबा सुटला व ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या लहान दरीत कोसळला.

गॅस सिलेंडर वाहू ट्रक मध्यरात्री मडकई येथे कलंडला; सुदैवाने जीवित हानी नाही
फोंडा
मडकई येथून सिलेंडर गॅस भरून निघालेला ट्रक मडकई कुंडई प्रवासाच्या दरम्यान मध्यरात्री कोसळला. ट्रक कलांडला त्यावेळी ट्रक मध्ये गॅस भरलेले सिलेंडर होते. एखाद्या सिलेंडरचा स्फोट झाला असता तर एक भीषण अपघात येथे घडला असता.
सविस्तर वृत्तानुसार, मडकई औद्योगिक वसाहतीत नॅचरल गॅस कंपनी आहे . इथून गॅस सिलेंडर भरून एक ट्रक ओल्ड गोवा येथे डिलिव्हरी देण्याकरता निघाला होता. मडकई औद्योगिक वसाहती मधून काही अंतर पार केल्यानंतर समोरून अचानकपणे एक वाहन भरधाव वेगाने आले. त्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा ताबा सुटला व ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या लहान दरीत कोसळला.
सुदैवाने या अपघातात जीवितहानी वगैरे झाली नाही. किरकोळ जखमी झालेल्या ड्रायव्हरला मडकई येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . तिथे उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला. फोंडा अग्निशामक दलाला सदर अपघाताची माहिती मिळताच, रात्री दीड वाजताच सुशील मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व भरलेले सिलेंडर अगोदर निकामी केले. सिलेंडर मधील सर्व गॅस काढण्यात आला.
म्हार्दोळ पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.