विहिरीत सापडला सांगाडा; मालकालाही बसला धक्का, पोलीस तपास सुरू

By काशिराम म्हांबरे | Updated: September 5, 2023 18:54 IST2023-09-05T18:54:47+5:302023-09-05T18:54:51+5:30

सदर प्रकार लक्षात आल्यानंतर विहिरीत काम करणाऱ्या कामगारांनी तेथून पळ काढला.

A skeleton was found in a well in the yard of a house in goa | विहिरीत सापडला सांगाडा; मालकालाही बसला धक्का, पोलीस तपास सुरू

विहिरीत सापडला सांगाडा; मालकालाही बसला धक्का, पोलीस तपास सुरू

म्हापसा­: किमान दीड ते तो दोन वर्षा पूर्वी मृत्यू पावल्याची शंखा असलेला बार्देश तालुक्यातील सांतारशेट -हळदोणा येथील एका घराच्या आवारातील विहिरीत एक सांगाडा सापडला आहे. संबंधित घर मालकाने विहिरीच्या साफ सफाईचे उसपण्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी हा प्रकार सोमवार ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उघडकीस आला.

सदर प्रकार लक्षात आल्यानंतर विहिरीत काम करणाऱ्या कामगारांनी तेथून पळ काढला. लागलीच घर मालकाच्या वतिने त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटना स्थळी दाखल होऊन विहिरीतून सांगाडा बाहेर काढला , तसेच पंचनामा करून सांगाडा बांबोळी येथील गोवा वैद्य किय महाविद्यालयात पाठवून दिला. त्या घराचे मालक मुंबईत असून घरात त्याची ८० वर्षीय वृद्ध आत्या एकटीच वास्तव्य करुन राहते. या प्रकारातून परिसरात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. पुढील तपास कार्य म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे. 

Web Title: A skeleton was found in a well in the yard of a house in goa