गोव्यात रेल्वे प्रवासात ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: May 9, 2024 11:02 IST2024-05-09T11:02:12+5:302024-05-09T11:02:27+5:30

पोलिस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आयेशा म्हामल पुढील तपास करीत आहेत.सोमवार दि. ७ रोजी वरील घटना घडली.

A senior citizen of Thane district died while traveling by train in Goa | गोव्यात रेल्वे प्रवासात ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

गोव्यात रेल्वे प्रवासात ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

मडगाव: रेल्वे प्रवासात एक ज्येष्ठ प्रवासी मृत पावल्याची घटना गाेव्यात घडली. के. रमण विजयन (६२) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील रहिवाशी आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोकण रेल्वे पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे.

पोलिस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आयेशा म्हामल पुढील तपास करीत आहेत.सोमवार दि. ७ रोजी वरील घटना घडली. मयत मंगला एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करीत होता. प्रवासात त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने नंतर त्याला मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात उतरविले व नंतर त्याला १०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्समधून येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मृतदेह मयताच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: A senior citizen of Thane district died while traveling by train in Goa

टॅग्स :goaगोवा