गोव्यातील कोलवा किनाऱ्यावर एक जण सापडला मृतावस्थेत
By सूरज.नाईकपवार | Updated: October 15, 2023 16:46 IST2023-10-15T16:46:02+5:302023-10-15T16:46:08+5:30
शनिवारी रात्री हा इसम कोलवा बीचवर होता. तो दारुच्या नशेतही होता.

गोव्यातील कोलवा किनाऱ्यावर एक जण सापडला मृतावस्थेत
मडगाव: गोव्यातील प्रसिद्ध कोलवा बीचवर आज सकाळी रविवारी सकाळी एक अज्ञात इसम म़ृतावस्थेत सापडला. मयताची ओळख पटू शकली नाही. तो पर्यटक आहे की स्थानिक याबाबतही पोलिस अनभिज्ञ आहेत. मयत अंदाजे ४५ ते ५० वयोगटातील असावा अशी माहिती कोलवा पाेलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांनी दिली.
शनिवारी रात्री हा इसम कोलवा बीचवर होता. तो दारुच्या नशेतही होता. किनारपट्टीवर तैनात जीवरेक्षकांनी त्याला तेथून जाण्यासही सांगितले होते. मात्र त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नव्हते . काल रविवारी तो बीचवरच झोपलेल्या अवस्थेत होता. तो काहीच हालचाल करीत नसल्याने १०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्समधून त्याला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. पुढील पोलिस तपास चालू आहे.