गोव्यातील मडगावात एका स्टेशनरी दुकानाला आग, लाखोंची मालमत्ता जळून खाक

By सूरज.नाईकपवार | Updated: March 6, 2024 12:20 IST2024-03-06T12:19:52+5:302024-03-06T12:20:02+5:30

गोव्यातील मडगाव शहरातील एका स्टेशनरी दुकानाला आग लागून लाखोंची हानी झाली. येथील लॉयला हायस्कुलजवळील मेसर्स सेलेब्रेशन गीफ्ट कम स्टेशनरी या दुकानाला  आज बुधवारी पहाटे सव्वा पाचच्या दरम्यान आग लागली.

A fire broke out at a stationery shop in Goa's Margao, property worth lakhs was gutted | गोव्यातील मडगावात एका स्टेशनरी दुकानाला आग, लाखोंची मालमत्ता जळून खाक

गोव्यातील मडगावात एका स्टेशनरी दुकानाला आग, लाखोंची मालमत्ता जळून खाक

मडगाव: गोव्यातील मडगाव शहरातील एका स्टेशनरी दुकानाला आग लागून लाखोंची हानी झाली. येथील लॉयला हायस्कुलजवळील मेसर्स सेलेब्रेशन गीफ्ट कम स्टेशनरी या दुकानाला  आज बुधवारी पहाटे सव्वा पाचच्या दरम्यान आग लागली. यात आतील संपूर्ण माल जळून खाक झाला तर याच दुकानाला जोडून असलेल्या मेसर्स साई झरोक्स अँण्ड स्टेशनरी शॉप या दुकानालाही आगीच झळ बसली.

मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी नंतर घटनास्थळी धाव घेउन आग विझविताना ५० लाखांची मालमत्ता बचाविली.मेसर्स सेलेब्रेशन हे दुकान संजन नाईक यांच्या मालकीचे आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट होउ शकले नसले तरी शॉटसर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी असा अग्निशमन दलाचा कयास आहे. दलाचे अधिकारी नारायण ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी सुमारे तीन तासांच्या अथक परिश्रमांनतर ही आग विझविण्यात यश मिळविले. दोन बंबचा वापर करण्यात आला.

Web Title: A fire broke out at a stationery shop in Goa's Margao, property worth lakhs was gutted