रस्त्यावर गाय आडवी आली, कारची दुचाकींना धडक; एक जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
By सूरज.नाईकपवार | Updated: November 17, 2023 16:19 IST2023-11-17T16:19:28+5:302023-11-17T16:19:44+5:30
कारने दुचाकीला धडक दिली. मृत पावलेला युवकाचे नाव आग्नेल रिबेलो असे असून, त्याच्या दुचाकीवर बसलेला त्याचा सख्या भाउ मॅकलॉन (१७) हाही या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

रस्त्यावर गाय आडवी आली, कारची दुचाकींना धडक; एक जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
मडगाव: रस्तावर गाय मध्ये आली अन झालेल्या अपघातात एक वीस वर्षीय युवक जागीच ठार झाला. काल शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यान सारझोरा ते गुडी दरम्यान अपघाताची ही भीषण घटना घडली. कारने दुचाकीला धडक दिली. मृत पावलेला युवकाचे नाव आग्नेल रिबेलो असे असून, त्याच्या दुचाकीवर बसलेला त्याचा सख्या भाउ मॅकलॉन (१७) हाही या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या दाेघांच्या भावामागे दुचाकीवरुन त्याचा नातेवाईक अबनेर पेरेरा (२१) हाही दुचाकीवरुन जात होता. कारची त्यालाही धडक बसली. त्यात तोही गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला गोमेकॉत पाठवून देण्यात आले आहे. या अपघातात ती गायही मृत पावली आहे. मयत व जखमी हे मायणा येथील रहिवाशी असल्याची माहिती मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी दिली. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघाताला कारणीभूत ठरलेला कारचालक शेल्टन फुर्तादो (३२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो ओर्ली येथील रहिवाशी आहे. त्याची वैदयकीय तपासणी केली जाणार असून, तो अपघाताच्या वेळी दारुच्या नशेत होता का याचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक देसाई यांनी दिली.
मयत कॅटरिंगच्या व्यवसायात होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तो आपला भाउ मॅकलॉन याच्यासमवेत डिवो दुचाकीवर होता. तर त्यांचा नातेवाईक अबनेर हा दुसऱ्या एका ॲक्टीवा स्कुटरवर होता. तर ज्याने या दोघांना धडक दिली तो शेल्टन हा कारमधून जात होता.