क्रिकेट खेळताना छप्परावर आढलेला चेंडू काढताना घसरुन पडल्याने एका मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2023 15:19 IST2023-04-16T15:19:45+5:302023-04-16T15:19:59+5:30
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात त्याला नेले असता तेथील डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

क्रिकेट खेळताना छप्परावर आढलेला चेंडू काढताना घसरुन पडल्याने एका मुलाचा मृत्यू
- सूरज पवार
मडगाव: क्रिकेटचा खेळ जीवावर बेतला. रविवारी येथील घोगळ हाउसिंग बोर्ड येथे एक घटना घडली. क्रिकेट खेळताना बॉल समोरच्या एका हायस्कुलच्या छप्पराला आढळला. चेंडू तेथेच अडकून पडल्याने एका १५ वर्षीय मुलाने छप्परावर जाउन तो चेंडू काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पत्रे फायबरचे असल्याने त्याचा पाय तेथे अडकला. त्याने सुटकेसाठी प्रयत्न केले. या घडबडीत तो खाली पडला व गंभीर जखमी झाला.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात त्याला नेले असता तेथील डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. सोहेल शेख असे मयताचे नाव आहे.अनैसर्गिक मृत्यू म्हणून फाताेर्डा पोलिसांनी वरील घटनेची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक अमिन नाईक पुढील तपास करीत आहेत. सकाळी आठच्या दरम्यान वरील घटना घडली. पोलिसांनी कायदेशीर सोपास्कार करुन मृतदेह मयताच्या कुटुंबियाच्या स्वाधीन केले. रविवार असल्याने नेहमी प्रमाणे मुले येथील मैदानावर खेळत होती अशी माहिती पोलिसांनी दिली.