पकाडपकडी खेळताना मिनीबस खाली आली, गोव्यात १० वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
By सूरज.नाईकपवार | Updated: May 31, 2023 18:49 IST2023-05-31T18:49:25+5:302023-05-31T18:49:47+5:30
बुधवारी दुपारी पावणेबाराच्या दरम्यान वरील घटना घडली

पकाडपकडी खेळताना मिनीबस खाली आली, गोव्यात १० वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
सूरज नाईक पवार, मडगाव: पकाडपकडीचा खेळ खेळताना मिनीबसच्या चाकाखाली सापडल्याने गोव्यातील मडगाव येथे एक दहा वर्षीय मुलगी ठार झाली. पाजिफोंड येथे बुधवारी दुपारी पावणेबाराच्या दरम्यान वरील घटना घडली. अमनाखातुन अन्सारी असे मयताचे नाव आहे. ती मूळ गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी आहे.
अमिना हीचे वडील ई. अहमद हे आपल्या कुटुंबियांसमवेत कालच गोव्यात आले होते. उदरनिर्वांहासाठी हे कुटुंब आपल्या अन्य एका ओळखीच्या कुटुंबियासमवेत ते आले होते. रेल्वेतून प्रवास करुन ते मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावर उतरले होते. नंतर चहा पिण्यासाठी ते पाजिफोंड येथे एका चहाच्या टपरीजवळ गेले होते. अमिनाची एक बहिण व भाउ तसेच दुसऱ्या कुटुंबातील एका ३ वर्षीय मुलगा पकडापकडीचा खेळ खेळत होते. खेळताना तो लहान ३ वर्षाच्या मुलगा रस्तावर आला, त्याचवेळी समोरुन मिनीबस येत होती. ती बघून त्या मुलाला वाचिवण्यााठी अमिना धावत आली व नेतमी त्या मिनीबसच्या पुढच्या चाकाखाली सापडली व गंभीर जखमी झाली. नतंर तिला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. तो मुलगाही मिनीबसच्या खाली अडकला, मात्र सुदैवाने त्याला कुठलीही इजा पोहचली नाही.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचानामा केला. उपनिरीक्षक प्रज्ञा जोशी पुढील तपास करीत आहेत.