दिवाळीच्या सुट्टीला ९ दिवसांची कात्री?
By Admin | Updated: July 18, 2014 02:06 IST2014-07-18T02:03:10+5:302014-07-18T02:06:32+5:30
वासुदेव पागी ल्ल पणजी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीला ९ दिवसांची कात्री लावण्याचे सध्या घाटत असून शिक्षण खाते व गोवा शालान्त मंडळाकडून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

दिवाळीच्या सुट्टीला ९ दिवसांची कात्री?
वासुदेव पागी ल्ल पणजी
विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीला ९ दिवसांची कात्री लावण्याचे सध्या घाटत असून शिक्षण खाते व गोवा शालान्त मंडळाकडून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. किमान २१० शालेय दिवस पूर्ण होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
२१ दिवस असलेली दिवाळीची सुट्टी ३ दिवस कापून या शैक्षणिक वर्षात १८ दिवस करण्यात आली होती. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच या निर्णयाची माहिती विद्यालयांना देण्यात आली होती. तसेच वेळापत्रकही पुरविण्यात आले होते; परंतु ३ दिवसांची कात्री वाढवून ती ९ दिवस करण्याचा प्रस्ताव गोवा शालान्त मंडळाने तयार केला आहे. ८ जुलै रोजी झालेल्या मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव सादरही करण्यात आला होता. बैठकीला मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो, सचिव भगीरथ शेट्ये यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावाला काही सदस्यांकडून विरोध करण्यात आला; परंतु पुढील बैठकीला तो पुन्हा चर्चेत आणला जाईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
शिक्षण संचालक अनिल पोवार यांना याविषयी विचारले असता, अद्याप आपल्याकडे शालान्त मंडळाचा प्रस्ताव पोहोचला नसल्याचे त्यांनी सांगितले; परंतु पुढील बैठकीत पुन्हा चर्चेला आणून नंतर हा प्रस्ताव शिक्षण खात्याकडे पाठविण्याचा निर्णय झाल्याची माहिती या बैठकीला हजर असलेल्या एका सदस्याकडून देण्यात आली.