शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

करवाटपातून गोव्याला ५,५७० कोटी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; अर्थसंकल्पाचा होणार मोठा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:08 IST

पायाभूत सुविधा विकास निधीतून गोव्याला निधी मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्रीय अर्थसंकल्पातून गोव्यात पर्यटन, शेती व शिक्षणासह विविध लाभघटकांना होईल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री सुभाष शिरोडकर, मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, वित्त खात्याचे संयुक्त सचिव (बजेट) प्रणव भट उपस्थित होते. अर्थसंकल्पात पर्यटन सुविधा, मत्स्य प्रक्रिया व शीतगृहे, विविध उद्योगांसाठी वित्तपुरवठा व शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढविण्यावर विशेष भर दिला आहे.' हा अर्थसंकल्प गोव्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा असून रोजगारनिर्मिती, उत्पन्नवाढ आणि राज्याच्या आर्थिक स्थैर्यास बळकटी देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री म्हणाले की, 'गोव्यातील खाजन शेती पुनरुज्जीवनासाठीही केंद्र सरकारने गोव्याच्या मागणीची सकारात्मक दखल घेतली आहे. हवामान सहिष्णू पायाभूत सुविधा उभारणी तसेच आपत्ती प्रतिबंधासाठी विशेष साहाय्य मिळावे यासाठी जलस्रोत खात्याने सादर केलेले प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहेत. याशिवाय वनाग्नी प्रतिबंधासाठी वन खात्याचे आणि आपत्ती व्यवस्थापन व नुकसानभरपाईसाठी महसूल विभागाचे प्रस्तावही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. केंद्र सरकारकडून या प्रस्तावांना मान्यता मिळाल्यास गोव्यातील शेती, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळेल.'

मुख्यमंत्री म्हणाले की, 'पायाभूत सुविधा विकास निधीतून गोव्याला निधी मिळणार आहे. नव्यानेच निर्मिती झालेल्या कुशावती या तिसऱ्या जिल्ह्यासाठी ५० वर्षाच्या व्याजमुक्त कर्जाच्या योजनेद्वारे ५०० कोटी रुपये निधी उपलब्ध होईल. सरकारने तशी मागणी याआधीच केलेली आहे. कुशावती जिल्ह्यात मोठी विकासक्षमता आहे. हा निधी पायाभूत सुविधांसाठी प्रभावीपणे वापरता येईल. २४,४४४ कोटी रु. पंधराव्या वित्त आयोगाच्या २०२०-२१ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीत कालावधीत करवाटपातून मिळाले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Receives ₹5,570 Crore Boost: CM Sawant Highlights Budget Benefits

Web Summary : Goa to benefit from central budget with focus on tourism, agriculture, and education. Funds allocated for infrastructure, fisheries, farming technology, and education. Khajan farming revival prioritized. CM Sawant anticipates economic growth and stability from these initiatives.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतTaxकर