उद्योग, हॉटेलांसोबत ५५ करार, आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करून संधीचा फायदा घ्यावा: मुख्यमंत्री सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:18 IST2025-03-06T13:17:45+5:302025-03-06T13:18:27+5:30
३३,००० हजार इच्छुकांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेखाली सुतार, गवंडी, शिंपी व इतर मिळून पारंपरिक व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे.

उद्योग, हॉटेलांसोबत ५५ करार, आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करून संधीचा फायदा घ्यावा: मुख्यमंत्री सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कुशल युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी उद्योग, हॉटेलांकडे मिळून सरकारने ५५ परस्पर सामंजस्य करार केलेले आहेत. राज्यातील युवकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
फर्मागुढी येथील आयटीआय केंद्रात डायकिन कंपनीच्या सहयोगाने स्थापन केलेल्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हर्चुअल पद्धतीने करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे चेअरमन कंवलजित जावा, कौशल्य विकास खात्याचे संचालक एस. एस. गांवकर, लेविन्सन मार्टिन्स व अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, 'डायकिन कंपनीकडे सरकारने हातमिळवणी केल्याने कौशल्यप्राप्त युवक, युवतींना नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल.
उद्योग तसेच हॉटेलांच्या गरजेनुसार मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्व आयटीआय केंद्रांमध्ये पूरक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. प्लंबिंग, फायर सेफ्टी, आदी अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. दहावीनंतर दोन वर्षांचा आयटीआय कोर्स केल्यास बारावी उत्तीर्ण समकक्ष प्रमाणपत्र दिले जाते.
असे आहेत लाभार्थी
सावंत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री पाथ योजना तसेच इतर योजनांमधून युवकांना कुशल बनवले जात आहे. मुख्यमंत्री अप्रेंटिस योजनेचा १०,१६६ युवकांनी लाभ घेतला. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा राज्यात ११,४३८ जणांनी लाभघेतला, तर ३३,००० हजार इच्छुकांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेखाली सुतार, गवंडी, शिंपी व इतर मिळून पारंपरिक व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे.