५३० चारचाकींसाठी बहुमजली पार्किंग

By Admin | Updated: November 24, 2014 01:29 IST2014-11-24T01:23:06+5:302014-11-24T01:29:13+5:30

पणजी : येथील सांता मोनिका जेटीसमोर पार्किंगसाठी उभारण्यात येत असलेल्या बहुमजली इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून येत्या १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्तिदिनी या इमारतीचे उद्घाटन केले जाईल.

530 Multi-storey parking for four-wheelers | ५३० चारचाकींसाठी बहुमजली पार्किंग

५३० चारचाकींसाठी बहुमजली पार्किंग

पणजी : येथील सांता मोनिका जेटीसमोर पार्किंगसाठी उभारण्यात येत असलेल्या बहुमजली इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून येत्या १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्तिदिनी या इमारतीचे उद्घाटन केले जाईल. ५३० चारचाकी वाहने पार्क करण्याची व्यवस्था या इमारतीत होणार असून पार्किंगची मोठी समस्या असलेल्या राजधानी शहरासाठी हा प्रकल्प दिलासादायक ठरणार आहे.
पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी दोन दिवसांपूर्वी या इमारतीची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. या तीन मजली इमारतीच्या बांधकामावर २३ कोटी ५० लाख रुपये खर्च झालेला असून विजेसाठी वायरिंग आणि रंगरंगोटीचे तेवढे काम बाकी आहे. कार, जीपगाड्या आदी चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठीच ही इमारत वापरात आणली जाईल. तीन मजल्यांवर (पान २ वर)

Web Title: 530 Multi-storey parking for four-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.