ट्रकखाली चिरडून वास्कोत ३७ वर्षीय पादचारी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:43 PM2020-12-23T16:43:52+5:302020-12-23T16:44:01+5:30

Goa News: दुर्देवीरित्या मरण पावलेला अमीशेट्टी हा तरुण आंन्द्राप्रदेश येथील आहे. तो गोव्यात रहायचा की नाही याबाबत चौकशी चालू आहे. अपघात केल्यानंतर ट्रकसहीत चालकाने केले पलायन, मात्र नंतर पोलीसांनी गजाआड केले.

A 37-year-old pedestrian was crushed to death on the spot in Vasco | ट्रकखाली चिरडून वास्कोत ३७ वर्षीय पादचारी जागीच ठार

ट्रकखाली चिरडून वास्कोत ३७ वर्षीय पादचारी जागीच ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: बुधवारी (दि.२३) पहाटे वास्कोच्या टीळक मैदानासमोरील एफएल गोंम्स मार्गावर झालेल्या भिषण अपघातात अमीशेट्टी गीरी नावाच्या ३७ वर्षीय पादचाºयाचा ट्रकखाली चिरडून जागीच अंत झाला. या अपघातात दुर्देवी रित्या मरण पोचलेला अमीशेट्टी हा आंन्द्रप्रदेश येथील मूळ रहीवाशी असून तो गोव्यात कुठे रहायचा याबाबत पोलीस चौकशी करित आहेत.


वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सदर अपघात घडला. वास्कोतून मुरगाव बंदराच्या बाजूने माल भरून भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने एफएल गोंम्स मार्गावर अमीशेट्टी याला ठोकर दिल्याने तो ट्रकखाली येऊन चिरडला. ट्रकखाली चिरडलेल्या अमीशेट्टी ला ट्रकने नंतर काही अंतर फरफटत नेल्याने त्याच्या अंगाचे काही भाग वेगळे होऊन तो जागीच ठार झाल्याचे पोलीसांनी सांगितले. या अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रकसहीत घटनास्थळावरून पलायन केल्याची माहीती पोलीसांनी देऊन नंतर त्याला गजाआड करून अटक केल्याचे सांगितले. तसेच या अपघातातील ट्रकही पोलीसांनी जप्त केला आहे. अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव मारुती डोमेरा (महाराष्ट्रा) असे असल्याची माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली.


बुधवारी पहाटे ट्रकखाली चिरडून मरण पोचलेला अमीशेट्टी अपघाताच्या वेळी रस्ता ओलांडत होता की रस्त्याच्या बाजूने चालत जात होता याची माहीती पोलीसांना मिळालेली नसून त्याबाबत चौकशी चालू आहे. मरण पोचलेल्या अमीशेट्टी याच्या कुटूंबाचा अजून पोलीसांना पत्ता लागलेला नसून तो गोव्यात रहायचा की नाही याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत. पोलीसांनी या अपघाताचा तसेच मरण पोचलेल्या अमीशेट्टी याच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवगृहात पाठवून दिला आहे. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करित आहेत. 

Web Title: A 37-year-old pedestrian was crushed to death on the spot in Vasco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात