शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

३0 हजार निवृत्तांना ‘डीए’वाढीची भेट

By admin | Updated: December 5, 2014 01:05 IST

पणजी : सरकारी पेन्शनरांना महागाई भत्त्यात १ जुलैपासूनचा ७ टक्के वाढीचा आदेश जारी झाला असून राज्यातील सुमारे ३0 हजार निवृत्तांना याचा लाभ मिळणार आहे.

पणजी : सरकारी पेन्शनरांना महागाई भत्त्यात १ जुलैपासूनचा ७ टक्के वाढीचा आदेश जारी झाला असून राज्यातील सुमारे ३0 हजार निवृत्तांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे मासिक ३ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारी तिजोरीवर पडणार आहे. वित्त खात्याचे संयुक्त संचालक मायकल डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती वेतनावरच दरमहा ३६ कोटी रुपये बाहेर काढावे लागतात. केंद्र सरकारने पेन्शनरांचा महागाई भत्ता १00 टक्क्यांवरून वाढवून १0७ टक्के केला आहे. राज्य सरकारने सेवेतील नियमित कर्मचाऱ्यांना याआधीच वाढीव महागाई भत्ता लागू केलेला आहे. सरकारी पेन्शनर तसेच फॅमिली पेन्शनरांच्या बाबतीत आदेश येण्यास विलंब लागला. त्यामुळे अंमलबजावणी विलंबाने होत आहे. जुलैपासून आतापर्यंतची वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी चालू महिन्यातच मिळणार आहे. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कुठल्याही भत्त्यात वाढ केली की, कालांतराने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही ती लागू होते. पेन्शनरांना नाताळला महागाई भत्त्यात वाढ मिळणार असल्याने ते खुश आहेत. राज्यात सुमारे ५५ हजार सरकारी कर्मचारी आहेत, त्यांना आधीच महागाई भत्ता मिळालेला आहे. (प्रतिनिधी)