शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कळंगुट येथे २ लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 20:19 IST

कळंगुट परिसरात पोलिसांकडून अमली पदार्थ जप्त करण्याचे सत्र सुरूच आहे. आज मंगळवारी पहाटे पोलिसांनी मूळ हिमाचल प्रदेश नागरिकाकडून २ लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. 

म्हापसा - गोव्यातील कळंगुट परिसरात पोलिसांकडून अमली पदार्थ जप्त करण्याचे सत्र सुरूच आहे. आज मंगळवारी पहाटे पोलिसांनी मूळ हिमाचल प्रदेश नागरिकाकडून २ लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. 

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार गावरावाडा - कळंगुट येथील एका रेस्टॉरेंटात स्वयंपाकी म्हणून कामाला असलेला तरुण सुनिल कुमार (वय २२) हा अमली पदार्थाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती त्यांनी प्राप्त झाली. लागलीच त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक स्थापन करुन सापळा रचण्यात आला.  रचलेल्या सापळ््यात तो अलगद अडकला. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली व त्याला चरस व गांजा सहित ताब्यात घेण्यात आले. 

कारवाईवेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ  १ लाख ४० हजार रुपये किमतीचा चरस व ५५ हजार रुपये किमतीचा गांजा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत १ लाख ९५ हजार रुपयांची आहे. ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना ही कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. 

त्याला अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करुन त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. निरिक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक आर पाटिल, उपनिरिक्षक सिताराम मळीक, कॉन्स्टेबल प्रवीण महाले, दिनेश मोरजकर, गोविंद शिरोडकर, वल्लभ पेडणेकर या पोलीस पथकाने ही यशस्वी कारवाई केली. याप्रकरणी पूढील पोलीस तपास सुरु आहे. कळंगुट पोलिसांनी नविन वर्षात अमली पदार्था विरोधात केलेली ही पहिलीच कारवाई आहे. मागील वर्षभरात एकूण ३१ गुन्हे पोलिसांनी नोंद केले होते. सध्या सुरू असलेली ही मोहिम पुढे आणखिन कडक करण्यात येणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली. 

टॅग्स :goaगोवाCrimeगुन्हाPoliceपोलिस