शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

१६,३०० विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By admin | Updated: December 4, 2014 01:18 IST

वासुदेव पागी ल्ल पणजी १ मार्च २०१५ रोजी सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी झाली असून एकूण १६,३०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

वासुदेव पागी ल्ल पणजी १ मार्च २०१५ रोजी सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी झाली असून एकूण १६,३०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मागील वर्षापेक्षा ३५०० अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. बारावी परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी यंदाच्या मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत बसणार आहेत, अशी माहिती गोवा शालान्त मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये यांनी दिली. मार्च २०१४ मध्ये १२,८०० विद्यार्थी होते. बारावीच्या वर्गात झालेली विद्यार्थ्यांची वाढ ही सर्वंकष नियमित मूल्यांकनाच्या (सीसीई) अंमलबजावणीचा भाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे. राज्यात सीसीईची अंमलबजावणी २०११ साली इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंत सुरू करण्यात आली होती. सीसीईच्या अंमलबजावणीखाली पहिली तुकडी दहावीला २०१३ साली पोहोचली होती. त्या वर्षीही दहावीची परीक्षा सर्वाधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. त्याच वर्षाचे विद्यार्थी आता बारावीला पोहोचल्यामुळे संख्येतील फरक कायम राहिला आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकदम ३५००च्या फरकाने वाढल्यामुळे या वर्षी उच्च शिक्षणासाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि दंतविषयक अभ्यासक्रमांसाठीही किमान टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षेसाठी २०,५०० विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली आहे. ३१ मार्च रोजी दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा एकाच दिवशी सुरू करण्यात आल्या होत्या.