शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या 13 गाड्या रद्द, तर 22 गाड्या उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 8:24 PM

कर्नाटकातून आणि महाराष्ट्रातून गोव्यात होणारी बस वाहतूक मुळसधार पावसामुळे पूर्णपणे बंद पडल्याने कोंकण रेल्वेवर त्याचा ताण पडल्याने मडगाव (गोवा) रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पडली होती.

मडगाव -  कर्नाटकातून आणि महाराष्ट्रातून गोव्यात होणारी बस वाहतूक मुळसधार पावसामुळे पूर्णपणे बंद पडल्याने कोंकण रेल्वेवर त्याचा ताण पडल्याने मडगाव (गोवा) रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पडली होती. अशातच गाडय़ा उशिरा धावत असल्यामुळे कोंकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने एकूण 14 गाडय़ा गुरुवारी रद्द करण्यात आल्या. तर गोकाक-पाच्छापूर या दरम्यानच्या रेल मार्गावरील पुलावर पुराचे पाणी आल्याने दिल्लीला जाणा-या गोवा एक्सप्रेसच्या गाडय़ा कोंकण रेल्वेच्या मार्गे वळविण्यात आल्या. या बदलांमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.कोंकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीप्रमाणे, तब्बल 22 गाडय़ा उशिरा धावत असून तीन गाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. कोंकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, कोंकण रेल्वेचा मार्ग कुठल्याही अडथळ्याविना मोकळा असला तरी गाडय़ा उशिरा धावत असल्यामुळे वेळापत्रक कोलमडल्याचे त्यांनी सांगितले.वेळापत्रक कोलमडल्यामुळे मडगावहून मुंबईला जाणारी कोंकण कन्या सव्वा तीन तास उशिर म्हणजे रात्री 8 वाजता सोडण्यात आली. मडगाव-मुंबई मत्स्यगंधा एक्सप्रेस सहा तास उशिराने सायंकाळी 6.50 वाजता तर मेंगलोर-मुंबई एक्सप्रेस तीन तास उशिरा म्हणजे रात्री 7.30 वाजता मडगावहून मुंबईला जाण्यासाठी निघाली. या व्यतिरिक्त या मार्गावरुन धावणा:या कारवार-यशवंतपूर एक्सप्रेस, मुंबई-करमळी एसी एक्सप्रेस, करमळी-मुंबई एसी एक्सप्रेस, पुणो-एर्नाकुलम एक्सप्रेस, एर्नाकुलम-पुणो एक्सप्रेस, हापा-मडगाव एक्सप्रेस, मडगाव-हापा एक्सप्रेस, मडगाव-मेंगलोर एक्सप्रेस, कन्नूर-कारवार एक्सप्रेस, कारवार - यशवंतपूर एक्सप्रेस, यशवंतपूर-कारवार एक्सप्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या.या मार्गावरुन धावणा:या मंगला एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, कोंकण कन्या, नेत्रवती एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, डबल डेकर एक्सप्रेस, कोचुवेल्ली-मुंबई एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस या गाडय़ा जवळपास एक ते पाच तास उशिरा धावत होत्या.पावसामुळे दक्षिण मध्य रेल्वे वेळापत्रकावरही परिणाम झाला. कर्नाटकच्या गोकाक-पाच्छापूर या भागातील 107 व 109 क्रमाकांच्या रेल्वे पुलावर पाणी आल्याने वास्को ते हुबळी र्पयतच्या थांबविण्यात आल्या. त्यामुळे बुधवारी निझामुद्दीनहून वास्कोला येण्यासाठी सुटलेली गाडी अंकई, दौंड, करमाड, सोलापूर, होटगी, विजापूर, गदग, हुबळी, लोंढा या मार्गे वळविण्यात आली तर वास्कोहून निजामुद्दीनला जाण्यासाठी गुरुवारी निघालेली गाडी मडगाव, रोहा, पनवेल, इगतपुरी, मनमाड या मार्गे वळविण्यात आली. तर वास्को-बंगळुरु एक्सप्रेस गाडीसाठी गोव्याहून जाणा:या रेल्वेला डब्यांची कमतरता जाणवल्याने हुबळीर्पयत ती रद्द करण्यात आली.आंतरराज्य बससेवा ठप्पकर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यात पावसाने कहर केल्यामुळे बंगळुरुहून व मुंबईहून गोव्यात येणा:या बसेस पूर्णपणो बंद होत्या. बंगळुरुहून काही बसेस दुस:या मार्गाने वळवून मडगावात आणल्याने सकाळी 8 वाजता पोहोचणा:या या गाडय़ा दुपारी 12 नंतर मडगावात दाखल झाल्या. जॉली ट्रॉव्हल्सचे अँथनी रॉड्रीगीस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, दररोज मडगावात बंगळुरुहून 40 ते 50 बसेस येत असतात. मात्र त्यापैकी सात ते आठच बसेस गुरुवारी मडगावात पोहोचल्या. तर मुंबई-कोल्हापूर महामार्ग पूर्णपणो बंद असल्याने यामार्गे एकही गाडी आली नाही.भाजी व दुधाचाही तुटवडाकर्नाटक व महाराष्ट्रातील रस्ते बंद असल्याने गोव्यात येणारी भाजी आणि दुध बंद झाले. त्यामुळे गोव्याच्या बाजारपेठेवर परिणाम झाला. गोव्यातून पुरवठा केला जाणा:या गोवा डेअरी व सुमूलाही राज्याबाहेरुन दुधाचा पुरवठा न झाल्याने या दोन्ही डेअरीतून केवळ 30 टक्केच उत्पादन झाल्याने मडगावसह दक्षिण गोव्यातील कित्येक भागात लोकांना गुरुवारचा दिवस दुधाविना काढावा लागला. 

टॅग्स :goaगोवाKonkan Railwayकोकण रेल्वे