मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या 13 गाड्या रद्द, तर 22 गाड्या उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 08:24 PM2019-08-08T20:24:11+5:302019-08-08T20:24:27+5:30

कर्नाटकातून आणि महाराष्ट्रातून गोव्यात होणारी बस वाहतूक मुळसधार पावसामुळे पूर्णपणे बंद पडल्याने कोंकण रेल्वेवर त्याचा ताण पडल्याने मडगाव (गोवा) रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पडली होती.

13 trains of Konkan Railway canceled due to heavy rains, while 22 trains were delayed. | मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या 13 गाड्या रद्द, तर 22 गाड्या उशिराने

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या 13 गाड्या रद्द, तर 22 गाड्या उशिराने

Next

मडगाव -  कर्नाटकातून आणि महाराष्ट्रातून गोव्यात होणारी बस वाहतूक मुळसधार पावसामुळे पूर्णपणे बंद पडल्याने कोंकण रेल्वेवर त्याचा ताण पडल्याने मडगाव (गोवा) रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पडली होती. अशातच गाडय़ा उशिरा धावत असल्यामुळे कोंकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने एकूण 14 गाडय़ा गुरुवारी रद्द करण्यात आल्या. तर गोकाक-पाच्छापूर या दरम्यानच्या रेल मार्गावरील पुलावर पुराचे पाणी आल्याने दिल्लीला जाणा-या गोवा एक्सप्रेसच्या गाडय़ा कोंकण रेल्वेच्या मार्गे वळविण्यात आल्या. या बदलांमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

कोंकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीप्रमाणे, तब्बल 22 गाडय़ा उशिरा धावत असून तीन गाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. कोंकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, कोंकण रेल्वेचा मार्ग कुठल्याही अडथळ्याविना मोकळा असला तरी गाडय़ा उशिरा धावत असल्यामुळे वेळापत्रक कोलमडल्याचे त्यांनी सांगितले.

वेळापत्रक कोलमडल्यामुळे मडगावहून मुंबईला जाणारी कोंकण कन्या सव्वा तीन तास उशिर म्हणजे रात्री 8 वाजता सोडण्यात आली. मडगाव-मुंबई मत्स्यगंधा एक्सप्रेस सहा तास उशिराने सायंकाळी 6.50 वाजता तर मेंगलोर-मुंबई एक्सप्रेस तीन तास उशिरा म्हणजे रात्री 7.30 वाजता मडगावहून मुंबईला जाण्यासाठी निघाली. या व्यतिरिक्त या मार्गावरुन धावणा:या कारवार-यशवंतपूर एक्सप्रेस, मुंबई-करमळी एसी एक्सप्रेस, करमळी-मुंबई एसी एक्सप्रेस, पुणो-एर्नाकुलम एक्सप्रेस, एर्नाकुलम-पुणो एक्सप्रेस, हापा-मडगाव एक्सप्रेस, मडगाव-हापा एक्सप्रेस, मडगाव-मेंगलोर एक्सप्रेस, कन्नूर-कारवार एक्सप्रेस, कारवार - यशवंतपूर एक्सप्रेस, यशवंतपूर-कारवार एक्सप्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या.

या मार्गावरुन धावणा:या मंगला एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, कोंकण कन्या, नेत्रवती एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, डबल डेकर एक्सप्रेस, कोचुवेल्ली-मुंबई एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस या गाडय़ा जवळपास एक ते पाच तास उशिरा धावत होत्या.

पावसामुळे दक्षिण मध्य रेल्वे वेळापत्रकावरही परिणाम झाला. कर्नाटकच्या गोकाक-पाच्छापूर या भागातील 107 व 109 क्रमाकांच्या रेल्वे पुलावर पाणी आल्याने वास्को ते हुबळी र्पयतच्या थांबविण्यात आल्या. त्यामुळे बुधवारी निझामुद्दीनहून वास्कोला येण्यासाठी सुटलेली गाडी अंकई, दौंड, करमाड, सोलापूर, होटगी, विजापूर, गदग, हुबळी, लोंढा या मार्गे वळविण्यात आली तर वास्कोहून निजामुद्दीनला जाण्यासाठी गुरुवारी निघालेली गाडी मडगाव, रोहा, पनवेल, इगतपुरी, मनमाड या मार्गे वळविण्यात आली. तर वास्को-बंगळुरु एक्सप्रेस गाडीसाठी गोव्याहून जाणा:या रेल्वेला डब्यांची कमतरता जाणवल्याने हुबळीर्पयत ती रद्द करण्यात आली.

आंतरराज्य बससेवा ठप्प
कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यात पावसाने कहर केल्यामुळे बंगळुरुहून व मुंबईहून गोव्यात येणा:या बसेस पूर्णपणो बंद होत्या. बंगळुरुहून काही बसेस दुस:या मार्गाने वळवून मडगावात आणल्याने सकाळी 8 वाजता पोहोचणा:या या गाडय़ा दुपारी 12 नंतर मडगावात दाखल झाल्या. जॉली ट्रॉव्हल्सचे अँथनी रॉड्रीगीस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, दररोज मडगावात बंगळुरुहून 40 ते 50 बसेस येत असतात. मात्र त्यापैकी सात ते आठच बसेस गुरुवारी मडगावात पोहोचल्या. तर मुंबई-कोल्हापूर महामार्ग पूर्णपणो बंद असल्याने यामार्गे एकही गाडी आली नाही.

भाजी व दुधाचाही तुटवडा
कर्नाटक व महाराष्ट्रातील रस्ते बंद असल्याने गोव्यात येणारी भाजी आणि दुध बंद झाले. त्यामुळे गोव्याच्या बाजारपेठेवर परिणाम झाला. गोव्यातून पुरवठा केला जाणा:या गोवा डेअरी व सुमूलाही राज्याबाहेरुन दुधाचा पुरवठा न झाल्याने या दोन्ही डेअरीतून केवळ 30 टक्केच उत्पादन झाल्याने मडगावसह दक्षिण गोव्यातील कित्येक भागात लोकांना गुरुवारचा दिवस दुधाविना काढावा लागला.



 

Web Title: 13 trains of Konkan Railway canceled due to heavy rains, while 22 trains were delayed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.