कळंगुट येथे आढळले ११५ डेंग्यूचे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 16:34 IST2023-09-29T16:33:56+5:302023-09-29T16:34:24+5:30
कळंगुट क्षेत्रात रुग्ण वाढल्याने पंचायतीच्या वतिने मोफत तपासणी मोहिम हाती घेतली आहे. तसा निर्णय पंचायतीच्या आरोग्य समितीच्या वतिने घेतला होता.

कळंगुट येथे आढळले ११५ डेंग्यूचे रुग्ण
काशीराम म्हांबरे
किनारी भागातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कळंगुट येथे एका महिन्यात डेंग्यूचे ११५ रुग्ण सापडले आहेत. पंचायतीचे सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.
कळंगुट क्षेत्रात रुग्ण वाढल्याने पंचायतीच्या वतिने मोफत तपासणी मोहिम हाती घेतली आहे. तसा निर्णय पंचायतीच्या आरोग्य समितीच्या वतिने घेतला होता. १ सप्टेंबर पासून सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेत अद्यापपर्यंत ४५३ लोकांची चाचणी करण्यात आली. त्यातील ११५ डेंग्यू बाघीत सापडल्याने सिक्वेरा म्हणाले. दर दिवशी सुमारे२० रुग्ण चाचणीसाठी पंचायत कार्यालयात येतात. बाघितांना मोफत ओषधे सुद्धा पंचायतीच्या वतिने देण्यात आली आहेत. चाचणीसाठी किट विकत घेऊन पंचायतीने डॉक्टरची नेमणुकही केली आहे. डेंग्यू पसरू नये यासाठी प्रत्येक प्रभागात किटनाशकांची फवारणी करण्यावरही भर देण्यात आला आहे.
चाचणी पूर्वी लोकात जागृती करण्यात आली होती. तसेच सरकारच्या प्राथमीक आरोग्य केंद्राने हा विषय गंभिरतेने घेतला नसल्याने पंचायतीला पुढाकार घेणे भाग पडल्याची माहिती यावेळी दिली. या मोहिमेवर सुमारे २ लाख रुपये खर्च करण्यात आला असून १५ आॅक्टोबरपर्यंत मोहिम सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सिक्वेरा म्हणाले. जे रुग्ण चाचणीसाठी कार्यालयात येऊ शकत नाही अशांची त्यांच्या घरी जाऊन चाचणी करण्यात आली आहे.