100 Kovid patients hospitalized in Goa in 24 hours, 6 deaths | गोव्यात २४ तासांत १०० कोविड रुग्ण इस्पितळात, ६ रुग्णांचा मृत्यू

गोव्यात २४ तासांत १०० कोविड रुग्ण इस्पितळात, ६ रुग्णांचा मृत्यू

पणजी : राज्यात कोविडने अत्यंत रौद्र रुप धारण केले असून सर्व गावे व शहरांमध्ये कोविड रुग्ण संख्या उभी-आडवी वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत ९२७ नवे रुग्ण आढळले. १०० रुग्ण उपचारांसाठी इस्पितळात दाखल झाले असून सहा जणांचा शुक्रवारी कोविडने मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी ३ हजार १८९ कोविड चाचण्या केल्या गेल्या व त्यावेळी ९२७ नवे रुग्ण आढळले. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. यापूर्वी कधीच चोवीस तासांत आठशे देखील रुग्ण आढळले नव्हते. गुरुवारी  ७५७  नवे  रुग्ण  आढळले  होते. शुक्रवारी ३५७ रुग्णांनी होम आयसोलेशन  स्वीकारले.  २८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

मडगाव, फोंडा, वास्को, पर्वरी, पणजी, म्हापसा, चिंबल, साखळी, डिचोली , पेडणे, शिवोली, कांदोळी, शिरोडा, कुठ्ठाळी हे खूप संख्येने कोविड रुग्ण असलेले भाग झाले आहेत. जिथे कोविड रुग्ण संख्या पूर्वी फक्त चार-पाच होती, तिथे आता शंभर झाली आहे.  डिचोलीत १४३,  साखळीत १६५,  शिवोलीत १६२ अशा प्रकारे सगळीकडे कोविडग्रस्तांची गर्दी होऊ लागली आहे.

सहा तासांत दोघांचा मृत्यू

राज्यात आता एकूण बळींची संख्या 868 झाली आहे.  शुक्रवारी जे सहा मृत्यू झाले,  त्यापैकी दोघांचे मृत्यू हे इस्पितळात आल्यानंतर सहा  तासांत झाले.  कोविडची लागण झाली तरी उपचार न घेता घरीच राहणाऱ्यांना प्रसंगी मृत्यूला सामोरे जावे लागते. गोमेको इस्पितळात एक रुग्ण दोन तासांत मरण पावला. गिरी येथील ४८ वर्षीय महिला, ठाणे येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्ण मरण पावले. शिवाय सिंधुदुर्ग येथील ६० वर्षीय पुरुष रुग्ण व बेळगाव येथील ५१ वर्षीय महिला रुग्ण यांचा गोव्यात कोविडने मृत्यू झाला. मयडा येथील ४४ वर्षीय पुरुष रुग्ण दगावला.

प्रमुख ठिकाणची रुग्ण संख्या

मडगाव--------७२५

वास्को------३७०

फोंडा-----४१७

कुठ्ठाळी-----------३४५

पर्वरी-----५८९

शिवोली-१६२

कांदोळी--------४१६

खोर्ली--------१२१

हळदोणा------१४०

म्हापसा--------४२६

पणजी------४१४

पेडणे---------१२५

साखळी------१६५

डिचोली------१४३

Web Title: 100 Kovid patients hospitalized in Goa in 24 hours, 6 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.