जि.प.च्या लिपिकाची आत्महत्या
By Admin | Updated: August 5, 2016 01:08 IST2016-08-05T01:08:59+5:302016-08-05T01:08:59+5:30
जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभागात वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत येथील रहिवासी राधाकृष्ण वामनराव वनमाळी ....

जि.प.च्या लिपिकाची आत्महत्या
अरसोडातील घटना : पाणी पुरवठा विभाग कार्यालयात होते कार्यरत
आरमोरी : जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभागात वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत येथील रहिवासी राधाकृष्ण वामनराव वनमाळी (४८) यांनी अरसोडानजीकच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली.
राधाकृष्ण वनमाळी हे बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील पाणी पुरवठा उपविभागाच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले. मात्र रात्र होऊनही ते घरी परतले नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. गुरूवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अरसोडा येथील त्यांच्या शेतशिवारातील विहिरीजवळ रस्त्याच्या कडेला एमएच ३३ जे ३६७८ क्रमांकाची दुचाकी उभी होती. याशिवाय विहिरीच्या तोंडीवर चपला, हेल्मेट, चष्मा, बॅग असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. सदर माहिती वनमाळी कुटुंबियांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
राधाकृष्ण हे महिनाभरापासून रजेवर होते. ते रूजू होण्यासाठी कार्यालयात गेले. मात्र त्यांना रूजू करून घेतले नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करीत याची चौकशी करावी, अशी मागणी वनमाळी कुटुंबियांनी केली आहे.