जि.प. अध्यक्षांनी केली पुलाच्या कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 02:33 IST2017-04-13T02:33:55+5:302017-04-13T02:33:55+5:30

वैलोचना नदीवर वैरागड-मानापूर दरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाची जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्यासह

Zip The President has reviewed the work of the bridge | जि.प. अध्यक्षांनी केली पुलाच्या कामाची पाहणी

जि.प. अध्यक्षांनी केली पुलाच्या कामाची पाहणी

वैरागडनजीक बांधकाम सुरू : जि. प. सदस्यही उपस्थित
मानापूर/देलनवाडी : वैलोचना नदीवर वैरागड-मानापूर दरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाची जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य संपतराव आळे, भाग्यवान टेकाम, लता पुंघाटे यांनी भेट देऊन पाहणी केली.
१९६४ साली वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीवर पूल बांधण्यात आला होता. परंतु सदर पूल अतिशय ठेंगणा व अरूंद आहे. थोडेफार पाऊस झाला तरी या पुलावरून वाहतूक बंद होऊन जात होती. त्यामुळे नागरिकांना कढोलीच्या पुलावरून १५ किमी चक्कर मारून आरमोरी येथे पोहोचावे लागत होते. मालेवाडापासूनचे नागरिक याच रस्त्याने येत असल्याने या पुलाचे विशेष महत्त्व होते. नवीन उंच पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार शासनाने पूल मंजूर करून बांधकाम हाती घेतले आहे. पाहणीदरम्यान पुलाचे बांधकाम चांगल्या दर्जाचे करण्याबाबत स्थानिक कंत्राटदाराला जि. प. अध्यक्ष व जि. प. सदस्यांनी निर्देश दिलेत. (वार्ताहर)

Web Title: Zip The President has reviewed the work of the bridge