जिल्हा परिषदेची लेटलतिफशाही

By Admin | Updated: September 6, 2014 01:53 IST2014-09-06T01:53:22+5:302014-09-06T01:53:22+5:30

साऱ्याच बाबतीत मागे असलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जिल्ह्यातील आदर्श शिक्षक निवडीचेही काम विलंबाने पार पाडल्याने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...

Zilla Parishad's Lieutenant Governor | जिल्हा परिषदेची लेटलतिफशाही

जिल्हा परिषदेची लेटलतिफशाही

गडचिरोली : साऱ्याच बाबतीत मागे असलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जिल्ह्यातील आदर्श शिक्षक निवडीचेही काम विलंबाने पार पाडल्याने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी गडचिरोली जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा सन्मान होऊ शकला नाही. याबाबीला केवळ जिल्हा परिषदेची लेटलतिफशाहीच कारणीभूत ठरल्याची प्रतिक्रिया अनेक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
सन २०१४-१५ या वर्षांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक निवडून त्यांचा सन्मान करण्याचे काम गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला करायचे होते. परंतु गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक निवड समितीची बैठक शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशी पार पडली. या बैठकीत ८ आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांची निवड करण्यात आली. १२ शिक्षकांची निवड करावयाची असताना केवळ ८ जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील वसा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विलास नक्टूजी भांडेकर, आरमोरी येथील जि.प. शाळेचे शिक्षक गोपीनाथ तुकाराम नेवारे, देसाईगंज तालुक्यातील आमगाव जि.प. शाळेचे शिक्षीका सुनंदा बाबुराव पारटवार, कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा शाळेचे शिक्षक पुरंदर रामचंद्र चौधरी, चामोर्शी तालुक्यातील पेठतळा जि.प. शाळेचे शिक्षक वासुदेव आत्माराम कुनघाडकर, मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर जि.प. शाळेचे शिक्षक अनिल शंकर मार्तीवार, अहेरी तालुक्यातील वेलगुर जि.प. शाळेचे शिक्षक रमेश पांडूरंग कुसनाके, भामरागड तालुक्यातील धोडराज जि.प. शाळेचे शिक्षक लालदेव फकीराजी कोडापे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राज्यभर आदर्श शिक्षकांचा ५ सप्टेंबर सत्कार होत असताना गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता आदर्श शिक्षकांच्या नावाची यादी माध्यमांकडे प्रसिध्दीसाठी पाठविली. सुत्रांच्या माहितीनुसार शिक्षक निवड समितीची बैठकच गुरूवारी पार पडली. त्यामुळे सत्कार सोहळा शुक्रवारी घेणे शक्यच नव्हते. त्यामुळे आता या सत्कार सोहळ्याची तारीख नंतर ठरविली जाईल, असे शिक्षण विभागाने सांगितले.

Web Title: Zilla Parishad's Lieutenant Governor