काेराेनानंतर आता झिका व्हायरसचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:25 IST2021-07-20T04:25:10+5:302021-07-20T04:25:10+5:30

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार असून तो १९४७ साली युगांडा देशातील काही माकडांमध्ये आढळला. त्यानंतर १९५२ साली ...

Zika virus outbreak after Kareena | काेराेनानंतर आता झिका व्हायरसचा धाेका

काेराेनानंतर आता झिका व्हायरसचा धाेका

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार असून तो १९४७ साली युगांडा देशातील काही माकडांमध्ये आढळला. त्यानंतर १९५२ साली युंगाडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्हीव्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरतो.

बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी या आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. त्यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायूदुखी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे साैम्य स्वरूपाची असतात. ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात. या आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही, तसेच या आजारात मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे, असे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे.

बाॅक्स

गराेदर महिलांना धाेका

गरोदरपणामध्ये झिका विषाणूची बाधा झाल्यास होणाऱ्या अर्भकाच्या डोक्याचा घेर कमी होतो असे दिसून आले आहे. या दोन्हीही गुंतागुंतीचा असलेला आंतरसंबंध नेमकेपणाने स्पष्ट होण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

आराेग्य विभागाने सुचविलेेले उपचार

-आजारावर कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही.

- रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी

-निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचे सेवन करावे.

- तापाकरिता पॅरासिटामल औषध वापरावे.

-ॲस्पिरीन अथवा एनएसएआयडी प्रकारातील औषधांचा वापर करू नये.

काेट

राज्याचे आराेग्य संचालक यांचे नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. पत्रात दिलेल्या सूचनांनुसार उपाययाेजना केल्या जातील. सध्या गडचिराेली जिल्ह्यात या आजाराचा एकही रुग्ण नाही. मात्र, याेग्य ती खबरदारी घेतली जाईल.

डाॅ. कुणाल माेडक, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिराेली.

Web Title: Zika virus outbreak after Kareena