रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी सरसावले युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST2021-05-07T04:38:47+5:302021-05-07T04:38:47+5:30

आरमोरी : सगळीकडे कोरोनाचा हाहाकार माजलेला असतानाच या संकटकाळात जिल्हा रक्तपेढीत मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ...

Youths rushed to overcome the blood shortage | रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी सरसावले युवक

रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी सरसावले युवक

आरमोरी : सगळीकडे कोरोनाचा हाहाकार माजलेला असतानाच या संकटकाळात जिल्हा रक्तपेढीत मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची नितांत गरज असल्याने स्वयंरक्तदाता जिल्हा समितीच्या वतीने गुरुवारी (दि. ६) आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले सामाजिक दायित्व निभावले.

कोरोनाची लस घेतल्यानंतर महिनाभर रक्तदान करता येत नाही. त्यामुळे बऱ्याच युवकांनी लस घेण्याच्या आधीच रक्तदान केले. त्यात रक्तदाते अंकुश गेडाम, चेतन दडमल, तुषार खापरे, प्रशांत खापरे, दीपक सोनकुसरे, शुभम धकाते, प्रतीक रामटेके, अक्षय पिपरे, मोहित राऊत, विपुल मिसार आदींचा समावेश होता.

समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत यांच्यासह प्रफुल खापरे, मनोज गेडाम, फिरोज पठाण, रोशन दुमाने, स्वप्निल सोरते, प्रशांत दोनाडकर, सारंग जांभुळे, स्वप्निल बेहरे, प्रल्हाद धोटे आदींनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. जिल्हा रक्तपेढीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी रक्तदात्यांना रक्तदानाचे फायदे सांगून योग्य मार्गदर्शन केले.

Web Title: Youths rushed to overcome the blood shortage