युवकांनी समाजासाठी झटावे
By Admin | Updated: March 4, 2017 01:21 IST2017-03-04T01:21:32+5:302017-03-04T01:21:32+5:30
प्रत्येक व्यक्तीवर समाजाचे ऋण आहे. त्यामुळे युवकांनी समाजाच्या प्रगतीसाठी काही वेळ देऊन समाजातील अडीअडचणी

युवकांनी समाजासाठी झटावे
दुर्वेश सोनवाने यांचे आवाहन : जिल्हास्तरीय युवा संमेलन
गडचिरोली : प्रत्येक व्यक्तीवर समाजाचे ऋण आहे. त्यामुळे युवकांनी समाजाच्या प्रगतीसाठी काही वेळ देऊन समाजातील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी केले.
नेहरू युवा केंद्र गडचिरोली व अभिनव बहुउद्देशिय कला मंच गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २ मार्च रोजी कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन एसडीपीओ डॉ. सागर कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने होते. प्रमुख अतिथी म्हणून परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहायोगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार, शरद साळुंके, मनोहर हेपट, प्राचार्य बल्लीनसिंग, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, डी. एस. मेश्राम, प्रा. संदीप अजमेरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अखिलेश प्रसाद मिश्रा, संचालन विशाल बेसरकर तर आभार अकिल शेख यांनी मानले. या कार्यक्रमात युवक, युवती, महिला मंडळांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)