युवकांनी समाजऋण फेडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:40 IST2018-01-01T00:39:46+5:302018-01-01T00:40:00+5:30
ज्या समाजात आपण जन्मलो व लहानाचे मोठे झालो. त्या समाजाला काहीतरी देणे लागते. त्यामुळे समाजऋण फेडण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.

युवकांनी समाजऋण फेडावे
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेवाडा : ज्या समाजात आपण जन्मलो व लहानाचे मोठे झालो. त्या समाजाला काहीतरी देणे लागते. त्यामुळे समाजऋण फेडण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.
रानवाही टोला येथे प्रौढांच्या कबड्डी व व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. सदर कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ४७ तर व्हॉलिबॉल स्पर्धेत १८ संघांनी सहभाग घेतला. कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक कुकडेल, द्वितीय क्रमांक बोडेना तर तृतीय क्रमांक रानवाही येथील कबड्डी संघाने पटकाविला. व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक येंगलखेडा तर द्वितीय क्रमांक मोहझरीच्या संघाने मिळविला. उद्घाटनीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. सदस्य नंदू नरोटे, पं.स. सभापती गिरीधर तितराम, जि.प. सदस्य गीता कुमरे, प्रभाकर तुलावी, जयंत हरडे, पं.स. सदस्य मोहन पुराम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अंकरशहा मडावी यांनी केले तर आभार काशीनाथ कुमोटी यांनी मानले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुनील कुमरे, रानवाहीचे सरपंच राकेश कोल्हे, माजी सरपंच चंद्रशहा कोडाप, उद्ध्व सयाम, देवराव सयाम, बाळकृष्ण उईके, विश्वनाथ कुमरे, उमाकांत मडावी आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात जयसेवा स्मृती पुरस्कार देऊन कबड्डी व व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेत्यांना संघांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर व्हॉलिबॉल व कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी मालेवाडा परिसरातील क्रीडाप्रेमींची गर्दी झाली होती. दरवर्षी रानवाही टोला येथे कबड्डी व व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन होते.