युवाशक्ती संघटनेच्या नगरसेवकाचा भाजपात प्रवेश
By Admin | Updated: July 16, 2016 01:42 IST2016-07-16T01:42:03+5:302016-07-16T01:42:03+5:30
पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती संघटनेकडून गडचिरोली पालिकेत विसापूर वॉर्डाचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले नगरपालिकेचे ...

युवाशक्ती संघटनेच्या नगरसेवकाचा भाजपात प्रवेश
न. प. निवडणुकीच्या तोंडावर : संजय मेश्राम झाले भाजपवासी
गडचिरोली : पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती संघटनेकडून गडचिरोली पालिकेत विसापूर वॉर्डाचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले नगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती संजय मेश्राम यांनी पालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीत खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी प्रवेश केला.
यावेळी भाजपच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे, गडचिरोली शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश विश्रोजवार, जनार्धन साखरे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, राकेश राचमलवार, हर्षद राहुलकर, जीवन गोडे, बापू करमे, दत्तम करमे, गणेश नेते, मनोज आखाडे आदींसह भाजपचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी नगरसेवक संजय मेश्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.
युवाशक्ती संघटनेने गडचिरोली नगर पालिकेवर सत्ता काबीज केल्यानंतर प्रथम भूपेश कुळमेथे यांच्या गळात नगराध्यक्ष पदाची माळ पडली. त्यांच्या कार्यकाळात नगरसेवक संजय मेश्राम यांच्याकडे पाणीपुरवठा सभापती पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अडीच वर्षांची सभापतीपदाची कारकिर्द त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
नगरसेवक मेश्राम यांचा विसापूर वॉर्ड व कॉम्प्लेक्स भागात चांगला जनसंपर्क आहे. आता त्यांच्या पाठोपाठ विसापूर प्रभागातील अनेक कार्यकर्ते भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)