गडचिरोलीत विजेचा धक्का लागून युवक ठार; शेजारच्या खोलीतील आईवडिलांनी सकाळी पाहिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 20:08 IST2020-06-16T20:07:44+5:302020-06-16T20:08:56+5:30
संदीप हा झेपण्यापूर्वी बेडरूममधील लाईट बंद करताना त्याला विजेचा धक्का लागला. तो जागीच ठार झाला.

गडचिरोलीत विजेचा धक्का लागून युवक ठार; शेजारच्या खोलीतील आईवडिलांनी सकाळी पाहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विहिरगाव येथे पाच किमी अंतरावर असलेल्या विहिरगाव (कुकडी) येथील युवकाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
संदीप जीवन ठाकरे (२८) असे मृतक युवकाचे नाव आहे. संदीप हा झेपण्यापूर्वी बेडरूममधील लाईट बंद करताना त्याला विजेचा धक्का लागला. तो जागीच ठार झाला. पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. आई-वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. त्यामुळे रात्रभर संदीपच्या अपघाताची बातमी आई-वडीलांना कळली नाही. मंगळवारी सकाळी त्याची आई त्याला उठविण्यासाठी बेडरूममध्ये गेली असता, संदीप तोंडाच्या बाजुने खाली पडून असल्याचे दिसून आले. याबाबत आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीनंतर मर्ग दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक चव्हाण, बिट जमादार नैताम वराडे करीत आहेत.