कालेश्वरम संगमावर अंघाेळ करताना युवक बुडाला
By गेापाल लाजुरकर | Updated: June 16, 2024 20:48 IST2024-06-16T20:48:20+5:302024-06-16T20:48:30+5:30
शाेधमाेहीम सुरू : तेलंगणा राज्याच्या हद्दीतील घटना

कालेश्वरम संगमावर अंघाेळ करताना युवक बुडाला
गडचिराेली : गाेदावरी नदीवर पवित्र स्नानासाठी कुटुंबासह आलेला युवक बुडाल्याची घटना रविवार, १६ जून राेजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तेलंगणा राज्यातील कालेश्वरम संगामावर घडली. बुडालेल्या युवकाचा सायंकाळपर्यंत पत्ता लागलेला नव्हता.गरिकापाटी अखिल (१९) रा. वारंगल, असे नदीत बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या सीमेवरील कालेश्वरम शहरानजीकच्या गाेदावरी नदीच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी गरिकापाटी अखिल हा त्याची रजनी व अन्य सदस्यांसाेबत कालेश्वरम तीर्थक्षेत्रात दर्शन घेण्यासाठी आला हाेता. मंदिरात पूजाअर्चा करण्यापूर्वी पवित्र स्नान करण्यासाठी ताे गोदावरी नदी पात्रात उतरला. नदीत स्नान करत असताना नजरचुकीने त्याचा पाय खोलवर गेला. ताे पाण्यात बुडून बेपत्ता झाला. परिसरात असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली; परंतु कुणाचेही प्रयत्न कामी आले नाही.
दरम्यान, सदर घटनेची माहिती कालेश्वरम पाेलिसांना देण्यात आली. येथील ठाणेदार भवानी सेन यांच्या मार्गदर्शनात पाेलिसांचे पथक घटनास्थळी पाेहाेचले. त्यानंतर स्थानिक मासेमारांच्या मदतीने युवकाची शाेधमाेहीम सुरू करण्यात आली; परंतु पाण्याचा प्रवाह सुरू असल्यामुळे ताे वाहत गेला असावा. सायंकाळपर्यंत त्याचा शाेध लागला नाही.