युवक काँग्रेस ‘सेवा सप्ताह’ पाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:31+5:302021-06-05T04:26:31+5:30

कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. अनेकांचा रोजगार हिरावला. सध्या त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ही बाब ...

Youth Congress will observe 'Service Week' | युवक काँग्रेस ‘सेवा सप्ताह’ पाळणार

युवक काँग्रेस ‘सेवा सप्ताह’ पाळणार

कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. अनेकांचा रोजगार हिरावला. सध्या त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करून ५ ते ११ जूनदरम्यान समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांना मदत करण्यात येणार आहे.

५ जून रोजी शेतकऱ्यांना रासायनिक खताचे वाटप करण्यात येणार आहे. दि. ६ जून रोजी महिला रुग्णालयात ब्लॅंकेटचे वितरण, ७ ला गरजू कामगारांना अन्नधान्याचे किट वितरण, ८ ला कोरोना सेंटरमध्ये व्हेपोरायझर वितरण, ९ला मच्छरदाणी, १०ला शिवणयंत्र तर ११ जून रोजी छत्रींचे वितरण करण्यात येणार आहे. कोरोनाकाळात जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन समितीने घोषित केलेल्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. यासाठी वेगवेगळे ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. त्याच ठिकाणी सदर उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली आहे.

Web Title: Youth Congress will observe 'Service Week'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.