युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध

By Admin | Updated: March 19, 2016 01:44 IST2016-03-19T01:44:06+5:302016-03-19T01:44:06+5:30

केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात युकाँचे

Youth Congress protests petrol, diesel price hike | युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध

युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध

गडचिरोली : केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात युकाँचे नेते पंकज गुड्डेवार, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.
या निदर्शनेदरम्यान युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपप्रणित केंद्र व राज्य शासनाच्या जनहितविरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला. भाजपप्रणित सरकारचा युकाँ नेत्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. याप्रसंगी युवक काँग्रेसचे गडचिरोली विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, अनुसूचित जाती विभाग सेलचे अध्यक्ष रजनिकांत मोटघरे, एजाज शेख, नंदू वाईलकर, जीवन कुत्तरमारे, अनिता मडावी, संजय घोटेकर, दीपक ठाकरे, तौफीक शेख, शाहरूख पठाण, राकेश गणवीर, गौरव अलाम, साहील पठाण, प्रतिक बारसिंगे, संघर्ष बोबाटे, केवळराम नंदेश्वर, अभिजीत धाईत, नचिकेत जंबेवार, अरबाज पठाण, प्रफुल आचले, सरफरोश पठाण, सैफ पठाण, सिध्दार्थ बांबोळे, गणेश ओजानी, मोहीम मुंडले, अजित खोब्रागडे, हिमांशू घुगलोत आदीसह बहुसंख्य युकाँ कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Youth Congress protests petrol, diesel price hike