युवक काँग्रेसचे धरणे व घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 03:05 IST2016-02-16T03:05:19+5:302016-02-16T03:05:19+5:30
जिल्ह्याच्या पोलीस भरतीत जिल्ह्यात रिक्त असलेल्या पोलीस शिपायांच्या सर्वच २६४ जागा भरण्याची शासनाने परवानगी

युवक काँग्रेसचे धरणे व घंटानाद आंदोलन
गडचिरोली : जिल्ह्याच्या पोलीस भरतीत जिल्ह्यात रिक्त असलेल्या पोलीस शिपायांच्या सर्वच २६४ जागा भरण्याची शासनाने परवानगी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी येथील इंदिरा गांधी चौकात धरणे व घंटानाद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्र्रेसचे प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, शहर अध्यक्ष सतिश विधाते यांनी केले. यावेळी प्रभाकर वासेकर, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अमोल भडांगे, रजनिकांत मोटघरे, नितेश राठोड, तौफीक शेख, राकेश गणवीर, गौरव आलाम, प्रतीक बारसिंगे, मिलिंद किरंगे, भूषण भैसारे, असफाक पठाण, नागोराव गावडे, विनोद कोरेटी, प्रशांत कोराम, रोहित साजुलवार यांच्यासह युवक काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन करून गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस भरतीत स्थानिक युवक युवतींना न्याय देण्यात यावा, अशी मागणी केली. इंदिरा गांधी चौकातील धरणे व घंटानाद आंदोलन आटोपल्यानंतर युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांना मागण्यांचे निवेदन दिले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनाही त्यांच्या कक्षात जाऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
या आहेत मागण्या
४पोलीस शिपायांच्या रिक्त सर्वच २६४ जागा भरण्यात यावा, जिल्ह्याच्या पोलीस भरतीत स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य देण्यात यावे, मैदानी चाचणीतील धावण्याचा वेळ वाढवून देण्यात यावा, पोलीस शिपाई पदाची वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.