आपच्या सदस्यांचा मुंबईत हाेणार सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:08 IST2021-02-21T05:08:46+5:302021-02-21T05:08:46+5:30
मेहनत करणारे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे आम आदमी पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रूजत चालला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राज्यात ...

आपच्या सदस्यांचा मुंबईत हाेणार सत्कार
मेहनत करणारे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे आम आदमी पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रूजत चालला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राज्यात अनेक ग्रामपंचायतीत आपची सत्ता आली आहे. गडचिराेली जिल्ह्यातही लखमपूर बोरी, कारकपली, मारोडा या गावांमध्ये आपचे सदस्य निवडून आले आहेत, तर मेंढा येथे आपला सत्ता मिळाली आहे. गावात जाऊन त्यांच्या भेटी घेण्यात आल्या आहेत. या सदस्यांचा मुंबई येथे सत्कार केला जाणार आहे. काही दिवसांमध्ये जिल्ह्यात नगरपंचायती व नगर परिषदांच्या निवडणुका हाेणार आहेत. या निवडणुकांमध्ये यश प्राप्त करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती
किशोर मानध्यान यांनी दिली. पत्रकार परिषदेला आपचे सचिव धनंजय शिंदे, जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, मनोज गडचुलवार, शुभम खरवडे, आशिष घुटके, रूपेश सावसाकडे, तबरेज पठाण आदी उपस्थित हाेते.