लसीकरणाबाबत जागृतीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:35 IST2021-05-17T04:35:04+5:302021-05-17T04:35:04+5:30
देसाईगंज येथील आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ...

लसीकरणाबाबत जागृतीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा
देसाईगंज येथील आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा होते. डॉ. गहाणे यांनी कोरोनाची अद्ययावत आकडेवारी, गृहविलगीकरणाची प्रक्रिया, लसीकरण मोहीम तसेच लस घेतल्यानंतर उद्भवणाऱ्या सर्वसाधारण समस्या आणि त्यावर उपाय याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व मार्गदर्शकांचा परिचय प्रा. डॉ. श्रीराम गहाणे यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. निहार बोदेले यांनी मानले. तांत्रिक सहकार्य रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. नीलेश हलामी यांनी केले.