योग शिक्षक प्रशिक्षण शिबिर
By Admin | Updated: June 17, 2016 01:26 IST2016-06-17T01:26:26+5:302016-06-17T01:26:26+5:30
पंतजली योग समितीच्या वतीने गडचिरोली शहरात गुरूवारपासून सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

योग शिक्षक प्रशिक्षण शिबिर
विविध प्रकारावर मार्गदर्शन : २५ दिवस चालणार शिबिर
गडचिरोली : पंतजली योग समितीच्या वतीने गडचिरोली शहरात गुरूवारपासून सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत व सायंकाळी ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत सदर शिबिर २५ दिवस घेतला जाणार आहे.
योग प्रशिक्षण शिबिरात योग शिक्षिका वर्षा देशमुख योग व प्राणायाम, आयुर्वेद रहस्य याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे या शिबिरात प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गुरूवारी शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी भारत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, पतंजलीचे सत्यनारायण चकिनारपुवार, जिल्हा युवा अध्यक्ष राहुल पवार, योग विस्तारक अनमदवार उपस्थित होते. १९ जूनपर्यंत या शिबिरात नागरिक व युवकांना प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)