पोलिसांना योगाचे धडे

By Admin | Updated: February 1, 2016 01:34 IST2016-02-01T01:34:42+5:302016-02-01T01:34:42+5:30

पतंजली योग समिती अहेरीच्या वतीने प्राणहिता पोलीस मुख्यालयातील पोलिसांना योगाचे धडे देण्यात आले.

Yoga Lessons Of The Police | पोलिसांना योगाचे धडे

पोलिसांना योगाचे धडे

अहेरी मुख्यालयात आयोजन : तणाव मुक्तीबाबत मार्गदर्शन
अहेरी : पतंजली योग समिती अहेरीच्या वतीने प्राणहिता पोलीस मुख्यालयातील पोलिसांना योगाचे धडे देण्यात आले. यादरम्यान पोलिसांना योगाची विविध आसणे शिकवून त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, पोलीस उपनिरीक्षक पवार, कदम, नन्नावरे, संग्रामसिंग, पाटील, भोंगीवार, कटरे, भोळ, टिकणे, मांडवकर, पतंजली योग समिती, नागपूरचे प्रभारी हंसराज मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरादरम्यान योगाचे महत्त्व, योग कधी करावा, कधी करू नये, योगामध्ये आहाराचे प्रमाण, बदलत्या जीवनशैलीत प्राणायमाची आवश्यकता आदी विषयांवर मार्गदर्शन करून योगाचे धडे हंसराज मिश्रा यांनी दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पतंजलीचे प्रा. डॉ. प्रकाश ढेंगळे, मुर्लीधर परकीवार, प्रा. आर. जी. सुखदेवे, श्रीनिवास भंडारी यांच्यासह इतर सदस्यांनी व पोलिसांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Yoga Lessons Of The Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.