येवली आदर्शग्रामच्या विकासात अधिकाऱ्यांचा खोडा

By Admin | Updated: February 22, 2016 01:38 IST2016-02-22T01:38:39+5:302016-02-22T01:38:39+5:30

केंद्र शासनाच्या निर्णयानुसार खासदार दत्तक आदर्श ग्राम योजनेंतर्गत एक आव्हान म्हणून येवली गावाला दत्तक घेऊन आदर्श करण्याचा संकल्प केला.

Yeweli Digitize the officials in the development of Matragram | येवली आदर्शग्रामच्या विकासात अधिकाऱ्यांचा खोडा

येवली आदर्शग्रामच्या विकासात अधिकाऱ्यांचा खोडा

खासदारांनी व्यक्त केली खंत : शुक्रवारी घेतला आढावा
गडचिरोली : केंद्र शासनाच्या निर्णयानुसार खासदार दत्तक आदर्श ग्राम योजनेंतर्गत एक आव्हान म्हणून येवली गावाला दत्तक घेऊन आदर्श करण्याचा संकल्प केला. मात्र जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एक वर्षाचा कालावधी उलटूनही येवली गाव आदर्श गावाकडे वाटचाल करू शकला नाही. याबाबत खासदार अशोक नेते स्वत:च मान्य करून संथ गतीने होत असलेल्या विकास कामांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खासदार अशोक नेते यांनी शुक्रवारी खासदार दत्तक ग्रामच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सभा आयोजित केली होती. या सभेला आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हा कोषाध्यक्ष नंदकिशोर काबरा, आदर्श गाव समितीचे अध्यक्ष विलास भांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक धनकर, तहसीलदार भोयर, संवर्ग विकास अधिकारी पचारे, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष रेखा डोळस, ज्योती मेश्राम, येवलीचे सरपंच गीता सोमनकर, पोलीस पाटील लक्ष्मी मेश्राम, उपसरपंच सुरेखा भांडेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष अश्विनी भांडेकर, सेवा सहकारी संस्थेचे सभापती चोखाजी भांडेकर, ग्रामपंचायत सदस्य राजू मेश्राम, रूमाजी भांडेकर, पांडुरंग भांडेकर, किसन गेडाम, गजानन गेडाम आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Yeweli Digitize the officials in the development of Matragram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.