येवलीची पाणी पुरवठा याेजना १० दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST2021-01-09T04:30:39+5:302021-01-09T04:30:39+5:30
येवली हे तालुक्यातील माेठे गाव आहे. या गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा याेजना आहे. मागील दहा दिवसांपासून पाणी पुरवठा याेजनेत ...

येवलीची पाणी पुरवठा याेजना १० दिवसांपासून बंद
येवली हे तालुक्यातील माेठे गाव आहे. या गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा याेजना आहे. मागील दहा दिवसांपासून पाणी पुरवठा याेजनेत तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. याबाबत पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला विचारणा केली असता, वाॅल्व निकामी झाला असल्याने नवीन वाॅल्व बसविणे आवश्यक असल्याचे सांगितले. वाॅल्व निकामी झाल्याने दहा दिवसांपासून पाणी पुरवठा याेजना बंद पडली आहे. याकडे ग्राम पंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. गावात हातपंप आहेत. मात्र अनेक वर्षांपासून हातपंप देखभाल व दुरूस्तीची रक्कम पंचायत समितीकडे जमा केली नाही. त्यामुळे हातपंप दुरूस्त करण्यास ग्राम पंचायतीने नकार दिला आहे.
ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. १५ जानेवारी राेजी मतदान आहे. नेमक्या याच कालावधीत पाणी पुरवठा याेजना बंद पडली आहे. त्यामुळे यापूर्वी ग्राम पंचायत सदस्य असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. पाणी पुरवठा याेजनेवरून त्यांच्याविराेधात प्रचार करण्याचा मुद्दा मिळाला आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा याेजना बंद असल्याने हिवाळ्यातही महिला पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे दिसून येत आहेत.