यंदा श्रावण २९ दिवसांचा; मंदिरात प्रवेश मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:28 IST2021-07-17T04:28:12+5:302021-07-17T04:28:12+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : दीड वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका आहे. त्यामुळे धार्मिक व पर्यटनस्थळे बंद आहेत. धार्मिक ...

This year Shravan is 29 days old; Will there be access to the temple? | यंदा श्रावण २९ दिवसांचा; मंदिरात प्रवेश मिळणार का?

यंदा श्रावण २९ दिवसांचा; मंदिरात प्रवेश मिळणार का?

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : दीड वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका आहे. त्यामुळे धार्मिक व पर्यटनस्थळे बंद आहेत. धार्मिक स्थळे बंद असल्याने भाविक घरीच पूजापाठ व अन्य विधी उरकतात. यंदा पहिला श्रावण साेमवार ९ ऑगस्ट राेजी येणार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात तरी भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार काय, असे वेध लागले आहेत. या वर्षी श्रावण महिना २९ दिवसांचा आहे.

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. महिनाभर अनेक भाविक व्रतवैकल्ये, पूजापाठ व उपास करतात. श्रावण महिन्यातील दर साेमवारी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळते. अनेक जण महिनाभर मांसाहार करीत नाहीत. तसेच वर्ज्य असलेले कार्यक्रम अथवा समारंभ आयाेजित करीत नाहीत. दर साेमवारी उपास करून आराधना करतात. विशेषत: शिव मंदिरांमध्ये भाविकांची माेठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. त्यामुळे श्रावण महिन्याला महत्त्व आहे. या वर्षी श्रावण महिना २९ दिवसांचा असून पाच साेमवार येत आहेत. काेराेनाचे सावट असल्याने यंदा तरी मंदिरात प्रवेश मिळणार काय, असा प्रश्न भाविकांना सतावत आहे.

बाॅक्स..

९ पासून श्रावण

९ ऑगस्टपासून श्रावण साेमवार सुरू हाेत आहेत. परंतु मंदिरे बंद आहेत. तरीसुद्धा काही मंदिरांच्या बाहेर पूजा साहित्य विक्री करणारी दुकाने आहेत. येथील साहित्य खरेदी करून भाविक बाहेरूनच दर्शन घेतात. ते आतमध्ये प्रवेश करीत नसल्याने मंदिराला देणगीही देऊ शकत नाहीत.

बाॅक्स ......

व्यावसायिक म्हणतात, साहित्य विक्री मंदच

काेट....

काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी विविध प्रतिष्ठाने शासनाने बंद ठेवली. धार्मिक स्थळेही बंद आहेत. गेल्या दीड वर्षात पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा धंदा बुडाला. अनेक जणांनी पर्यायाने दुसरा धंदा सुरू केला. यातच आता उपजीविका चालवावी लागत आहे. उन्हाळ्यात लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने काही प्रमाणात साहित्य विक्रीची दुकाने सुरू आहेत. परंतु दर्शनासाठी माेजकेच भाविक येतात.

- नारायण शेबे, व्यावसायिक

काेट......

मंदिरांच्या बाहेर पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये बहुतांश महिला व्यावसायिक आहेत. ज्या महिला निराधार किंवा एकल आहेत अशा महिला या व्यवसायात आहेत. याच व्यवसायावर त्या उपजीविका करीत आहेत. परंतु काेराेनामुळे महिलांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. दीड वर्षात धंदा बुडाला. अनेक वर्षांची मिळकतही आता राहिली नाही. त्यामुळे शासनाने मदत करावी.

- कविता बाेंद्रे, व्यावसायिक

Web Title: This year Shravan is 29 days old; Will there be access to the temple?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.