यंदा १६९ गावांची जलयुक्त शिवारसाठी निवड

By Admin | Updated: January 28, 2016 01:14 IST2016-01-28T01:14:22+5:302016-01-28T01:14:22+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम राज्यात राबविला जात आहे.

This year, 169 villages have been selected for water supply | यंदा १६९ गावांची जलयुक्त शिवारसाठी निवड

यंदा १६९ गावांची जलयुक्त शिवारसाठी निवड

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम राज्यात राबविला जात आहे. गतवर्षी १५२ गावांमध्ये २ हजार ४४४ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी २ हजार १६० कामे ३८ कोटी रूपये निधी खर्च करून पूर्ण झाली आहे. यंदा १६९ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविले जाणार आहे. या गावांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ज्या भागात विजेची सोय नाही, अशा भागातील १२५ सौर ऊर्जेवर चालणारे मोटारपंप शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी ४४ विविध कामांचे भूमिपूजन केले होते. पूर्ण झालेल्या सर्व कामांच्या माध्यमातून १ हजार ५३१ हेक्टर अतिरिक्त क्षेत्र आता सिंचनाखाली येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ही जिल्ह्यासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: This year, 169 villages have been selected for water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.