यमाजी मडावी याला न्यायालयीन कोठडी

By Admin | Updated: April 25, 2016 01:20 IST2016-04-25T01:20:35+5:302016-04-25T01:20:35+5:30

कनेरी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या यमाजी मडावी या आरोपीस न्यायालयाने

Yamanji Madavi to the judicial custody | यमाजी मडावी याला न्यायालयीन कोठडी

यमाजी मडावी याला न्यायालयीन कोठडी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण
ंगडचिरोली : कनेरी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या यमाजी मडावी या आरोपीस न्यायालयाने २१ एप्रिल रोजी न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची कारागृहात रवानगी झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मादगी समाज संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण रामटेके, मादगी वेल्फेअर फोरमचे अध्यक्ष समया पसुला, देवाजी लाटकर यांनी २२ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक करावी, अशी मागणी केली होती. मात्र पोलिसांनी त्याच्यापूर्वीच १९ एप्रिल रोजी आरोपीवर भादंवि कलम ३७६, ५०६ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्याला २१ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली. मादगी समाज संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण रामटेके, समया पसुला व देवाजी लाटकर यांनी समाजाची दिशाभूल करणारे वृत्त पसरविले आहे, असे गडचिरोली पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Yamanji Madavi to the judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.