शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

जागतिक पर्यटन दिन : गडचिरोलीतील या पर्यटन स्थळांना भेट दिली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:22 IST

Gadchiroli : पर्यटकांचा वाढू शकतो ओढा; 'झाडी'त दडलंय सौंदर्य; पण विकास होईना !

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : घनदाट जंगल, डोंगरदऱ्या पहाड, बारमाही वाहणाऱ्या नद्या यामुळे नैसर्गिकरीत्या पर्यटनस्थळ निर्माण झाले. बारमाही पर्यटनाची संधी असलेला गडचिरोली जिल्हा पर्यटकांना आकर्षित करतो. येथील पर्यटनस्थळांच्या विकासाला वाव मिळाल्यास पर्यटकांचा ओढा वाढू शकतो. जागतिक पर्यटन दिनानिमित्त जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा घेतलेला हा आढावा.

गडचिरोली हा नक्षलप्रभावित जिल्हा आहे. याच कारणाने जिल्ह्यातील पर्यटनाला गालबोट लागले आहे. पर्यटनस्थळे असतानाही त्यांचा विकास झालेला नाही. नक्षल समस्या यासाठी कारणीभूत असली तरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास झाला नाही. तसेच पर्यटनाला चालना मिळाली नाही. जिल्ह्यात मार्कंडादेव हे महत्त्वाचे धार्मिक तीर्थस्थळ आहे. आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे पुरातन मंदिरे पर्यटकांना भुरळ घालतात. 

उकळत्या पाण्याचे कुंड अहेरी तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) येथे उकळत्या पाण्याचे कुंड येथील खास आकर्षण आहे. हा परिसर अतिदुर्गम असल्याने पर्यटकांची संख्या कमी आहे. विकासही खुंटलेला आहे.

ग्लोरी ऑफ फॉरेस्ट आलापल्ली वनविभागात आलापल्ली भामरागड मार्गावरील तलवाडा गावापासून जंगलात दक्षिण दिशेकडे ७ किमी अंतरावर ग्लोरी ऑफ फॉरेस्ट आहे. वनवैभव अनुभवण्यासाठी यासारखे दुसरे स्थळ नाही.

टिप्पागड पहाडीमहाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कोरची तालुक्यात असलेल्या टिप्पागड पहाडी डी हे हे धार्मिक व नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे. येथील डोंगररांगेवर असलेला तलाव प्रेक्षणीय आहे. हे स्थळ पर्यटकांचे आकर्षण आहे.

वडदमचे जीवाश्म पार्क सिरोंचा तालुक्याच्या वडदम येथे डायनासोरचे जीवाश्म आढळले होते. हे जीवाश्म पाहता यावे, यासाठी वनविभागाने येथे पार्कची निर्मिती केली. येथे अनेक पर्यटक वर्षभर भेटी देत असतात.

बिनागुंडा धबधबा भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात गावापासून घनदाट जंगलात धबधबा आहे. येथील पहाडीवरून वर्षभर पाणी खाली कोसळत असते. येथेसुद्धा पर्यटक भेटी देतात.

कमलापूरचा हत्ती कॅम्प अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथे येथे राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. येथे प्रशिक्षित हत्ती असून, त्यांचा वापर जंगलातील लाकडाची ने-आण करण्यासाठी केला जातो. सध्या येथे आठ हत्ती आहेत.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीtourismपर्यटन