विद्यापीठात सीबीसीएसवर कार्यशाळा
By Admin | Updated: January 24, 2015 00:54 IST2015-01-24T00:54:19+5:302015-01-24T00:54:19+5:30
स्थानिक गोंडवाना विद्यापीठात चाईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम (सीबीसीएस) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरूवारी करण्यात आले.

विद्यापीठात सीबीसीएसवर कार्यशाळा
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठात चाईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम (सीबीसीएस) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरूवारी करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, बीसीयूडीचे प्रभारी संचालक डॉ. एस. एम. रोकडे, परीक्षा नियंत्रक डॉ. जे. व्ही. दडवे, वित्त व लेखाधिकारी बा. स. राठोड, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्यासह अधिष्ठाता, संलग्नीत महाविद्यालयांचे प्राचार्य, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पाराशर यांनी चाईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले. डॉ. दीक्षित यांनी भाषणादरम्यान चाईस बेस्ट क्रेडिट सिस्टीमच्या प्रणालीवर प्रकाश टाकला व त्याचे महत्त्व विशद केले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यार्थ्यांना भारतातील कोणत्याही विद्यापीठात पसंतीनुसार विषय निवडता येतात. त्यामुळे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. साधक व्यक्ती म्हणून लाभलेले डॉ. आलोक चक्रवाल, डॉ. राजश्री वैष्णवी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. ईश्वर मोहुर्ले तर आभार डॉ. एस. एम. रोकडे यांनी मानले.