संरक्षित शेतीबाबत कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:34+5:30
शेडनेटमुळे उन्हाळ्यात कडक उन्हापासून तर पावसाळ्यात मुसळधार पावसापासून पिकाचे संरक्षण करणे शक्य होते. अनुदानावर शेतकºयांना शेडनेट उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेडनेटचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनाबरोबरच त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यर्वधन होईल, यासाठी प्रयत्न करावा.

संरक्षित शेतीबाबत कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग, हरीतगृह यांचा वापर करून संरक्षित शेती करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या पुढाकारातून शुक्रवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, मत्स्य व्यवसाय विकास आयुक्त वैद्य, केव्हीकेचे पुष्पक बोथीकर, जैन इरीगेशनचे जिल्हा व्यवस्थापक गावंडे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर, मुलचेराचे तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, चामोर्शीचे तालुका कृषी अधिकारी वसंत वळवी, मंडळ कृषी अधिकारी सुरज जाधव आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी भाजीपाल्याचे उत्पादन बारमाही घ्यायचे असेल तर शेडनेटचा वापर अत्यंत आवश्यक आहे. शेडनेटमुळे उन्हाळ्यात कडक उन्हापासून तर पावसाळ्यात मुसळधार पावसापासून पिकाचे संरक्षण करणे शक्य होते. अनुदानावर शेतकऱ्यांना शेडनेट उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेडनेटचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनाबरोबरच त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यर्वधन होईल, यासाठी प्रयत्न करावा. प्रक्रिया झाल्यास मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळेल. शेती करताना शेतकऱ्यांनी शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग, हरीतगृह यांचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले. जैन इरीगेशनचे जिल्हा व्यवस्थापक गावंडे यांनी मार्गदर्शन करताना शेडनेटचा वापर कसा करावा, त्यासाठी जागेची निवड, पिकांची लागवड, शेडनेटच्या वापरामुळे होणारे फायदे, या विषयी मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी प्रतिभा चौधरी यांनी स्वत:च्या शेतात केलेल्या प्रयोगांबाबत मार्गदर्शन केले. संचालन मंडळ कृषी अधिकारी लिलाधर पाठक तर आभार कुंदा कुमरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजू राठोड, मोरे, कन्नाके यांनी सहकार्य केले.
जिल्ह्यात शेडनेटचा वापर आवश्यक
गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १३०० मिमी पाऊस पडते. अधिकच्या पावसामुळे भाजीपाल्यासह इतर नाजूक पिकांचे नुकसान होते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात शेडनेटचा वापर होणे आवश्यक आहे. शासनाकडून अनुदानावर शेडनेट उपलब्ध करून दिले जाते. कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी विचारपूस केल्यास त्यांना या योजनेविषयीची माहिती उपलब्ध होण्यास होईल. शेडनेटच्या वापरातून अधिकचे उत्पादन घेणे शेतकºयांना शक्य होणार असल्याने त्यांनी शेडनेटचा वापर करावा, असे आवाहन अधिकाºयांनी कार्यशाळेदरम्यान केले.