कुरूड येथे व्यसनमुक्त गावासाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST2021-07-22T04:23:20+5:302021-07-22T04:23:20+5:30
यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक भारती उपाध्ये यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत अधिनियम दारूबंदी कायदा, कोटपा कायदा, अन्न सुरक्षा ...

कुरूड येथे व्यसनमुक्त गावासाठी कार्यशाळा
यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक भारती उपाध्ये यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत अधिनियम दारूबंदी कायदा, कोटपा कायदा, अन्न सुरक्षा व मानके कायदा, साथरोग प्रतिबंधित कायदा, सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री बंदी कायदा, पेसा कायदा, बालसंरक्षण कायदा आदी कायद्यांची माहिती देऊन आपले गाव कसे व्यसनातून मुक्त करता येईल, याबद्दल सांगण्यात आले. तसेच गावातील अडचणींवर चर्चा करून उपाययोजना करण्यात आल्या. सोबतच पुढील तीन महिन्यांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडत ग्रामपंचायतअंतर्गत गावे व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेत ग्रामपंचायत कुरूड, कोकडी, कोंढाळा, आमगाव व शिवराजपूर येथील सरपंच, उपसरपंच व सदस्य असे एकूण १५ पदाधिकारी सहभागी झाले होते.